Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedदेवाची आमटी

देवाची आमटी

स्वाती भाऊसाहेब पुरी

साहित्य : मठडाळ, मसुरडाळ, हरभरा डाळ, इतर डाळींपेक्षा तूरडाळ जास्त वापरावी, आमसूल, गरजेपुरते किसलेले खोबरे, गरम मसाला व धना पावडर जाडसर शेंगदाण्याचा कूट, थोडासा गूळ इ.

- Advertisement -

कृती : सर्व प्रथम 3 छोटे चमचे तेल पातेल्यात टाकावे. तेलात हिंग पावडर टाकावी. त्यातच तमालपत्र व किसलेले खोबरे सोनेरी कलर येईपर्यंत परतावे. मग 2 चमचे धना पावडर टाकावी. अंबारीचा संडे मसाला असल्यास एक चमचा टाकावा व गरम मसाला टाकावा व सर्व मिश्रण चांगले परतवून घ्यावे.

नंतर सर्व शिजवून घेतलेल्या डाळी टाकाव्यात. मग चवीनुसार मीठ टाकावे. नंतर आमसूल टाकावे. मग चवीनुसार गूळ टाकावा. शेवटी थोडासा शेंगादाण्याचा जाडसर कूट टाकावा. चांगली उकळी आल्यावर बारीक चिरून कोथिंबिर घालावी व बाजरीच्या भाकरी बरोबर स्वाद घ्यावा.

अतिशय झटपट बनणारी व जिभेला एक आगळी वेगळी टेस्ट देणारी अप्रतिम आमटी नक्की करून पहा.

मो. नं. -9421701087

- Advertisment -

ताज्या बातम्या