Wednesday, April 24, 2024
Homeधुळेबनावट दारुचा अड्डा उध्वस्त

बनावट दारुचा अड्डा उध्वस्त

धुळे Dhule । प्रतिनिधी

तालुक्यातील चिंचवार शिवारात स्थानिक गुन्हा अन्वेषण (Local crime investigation) शाखेच्या पथकाने छापा (Raid) टाकत बनावट दारुचा कारखाना उध्वस्त (Counterfeit liquor factory demolished) केला. घटनास्थळाहुन सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त (Four and a half lakh items confiscated) करण्यात आला. याप्रकरणी शेत मालकासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

चिंचवार गावच्या शिवारात वन जमिनीवर (Forest lands) किरण सुधाकर देशमुख हा त्याच्या साथीदारासह अवैधरित्या दारु बनविण्याचा कारखाना (liquor factory) चालवत असल्याची माहिती एलसीबी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना काल मिळाली. त्या अनुषंगाने एलसीबीच्या पथकाने काल सकाळी 10.30 वाजता चिंचवार शिवारातील रफिक महेमुद पटेल याच्या शेतातील घरावर छापा टाकला. यावेळी बनावट दारु तयार करताना किरण देशमुख, रफिक पटेल दोघे रा.चिंचवार ता.धुळे, रामसिंग बंन्सीलाल ठाकरे (वय 25) रा.शिवराय चौक, मालपूर दोंडाईचा, हरिष हरुण पटेल रा.धुळे या चौघांना पकडले.

त्यांच्याकडून दोन लाख रुपये किंमतीची एम.एच.19 ए.एक्स. 0620 क्रमांकाची टाटा सुमो, 74 हजार 880 रुपये किंमतीची टँगो पंच देशी दारु, 1 लाख 12 हजार 320 रुपये किंमतीची रॉयल स्पेशल व्हिस्की, 3 हजार 480 रुपये किंमतीच्या देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, 50 हजार 50 रुपये किंमतीचे बुच पॅकींग व दारु मिक्सींग (Mixing alcohol) करता उपयोग पडणारे तीन मशिन, 650 रुपये किंमतीचे दारुच्या बाटल्यांचे बुच 15 हजार 550 रुपये किंमतीचे 4 मोबाईल फोन, 6 हजार 380 रुपये किंमतीचे दारु बनविण्यासाठी लागणारे इतर साहित्य असा 4 लाख 63 हजार 260 रूपये किंमतीचा मुद्देेमाल जप्त (Issues confiscated) करण्यात आला. विदेशी दारुबाबत आरोपींना विचारणा केली असता सदरचा मुद्देमाल संजय मासुम पटेेल (वय 50) रा.चिंचवार व त्याच्या साथीदारांनी ठेवल्याचे सांगितले.

संजय पटेलला त्याच्या घरातुन ताब्यात घेवून विदेशी दारुबाबत विचारणा केली असता त्याने ही दारु गुलाब देविदास शिंदे रा.कावठी, गुलाबचा उभंड येथे राहणारा पाटील नावाचा मित्र याचा असल्याचे सांगितले. दारु बनविण्यासाठी लागणारे साहित्य शिरपूर येथील दिनेशने पुरविल्याची कबुली किरण देशमुखने दिली आहे. पो.शि.सागर शिर्के यांच्या फिर्यादीवरुन सोनगीर पोलिसात किरण देशमुखसह 8 जणांविरुध्द भादंवि 328, 420 प्रमाणे गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय हेमंत पाटील, एपीआय प्रकाश सोनार पीएसआय योगेश राऊत, एएसआय धनंजय मोरे, हे.कॉ. संजय पाटील, प्रकाश सोनार, संदीप सरग, संदीप पाटील, पंकज खैरमोडे, सागर शिर्के, योगेश जगताप, किशोर पाटील, महेंद्र सपकाळ, कैलास महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या