Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआगीत संसारोपयोगी वस्तू खाक

आगीत संसारोपयोगी वस्तू खाक

ठाणगाव । वार्ताहर | Thangaon

तालुक्यातील पाडळी जवळील ठाकरवाडीत घरास आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक हाऊन रोख रकमेसह दिड लाखाचे नुकसान झाल्याची घटना नुकतीच घडली.

- Advertisement -

ठाकरवाडी येथील संजय राधाकिसन वारघडे यांच्या राहत्या घराला दुपारी दोनच्या सुमारास आग (fire) लागली. कुटुंबातील सर्व सदस्य गहू (Wheat), हरभरा (Gram), गवत कापण्याच्या कामासाठी गेले होत. घरात कुणी नसल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. जवळच राहणारे गणपत वारघडे, कविता उघडे, सविता वारघडे, मनीषा वारघडे, सुरेश वारघडे यांना बंद घरातून धुराचे लोट बाहेर येताना दिसले.

त्यांनी माजी सरपंच चद्रभान रेवगडे यांना भ्रमनध्वनीद्वारे घराला आग लागल्याचे सांगितले. रेवगडे यांनी ग्रामस्थांना घेऊन येत आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीत दहा ते पंधरा पोते धान्य, रोख पंधरा हजार रुपये व दैनंदिन वापराच्या सर्व वस्तू भस्मसात झाल्या. आग विझविण्यासाठी संदीप रेवगडे, सुनील रेवगडे , रमेश वारघडे, रवि वारघडे, अरुण वारघडे,

खंडू वारघडे, गणेश रेवगडे, रेवन गोसावी, गणेश वारघडे, शिवाजी उघडे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीत पुर्ण संसार उध्वस्त झाला. यामुळे पूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. कुटुंबाला पुन्हा उभे करण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न होत असून आपल्या परिने शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आवाहन हिरामण आगिवले व विजय वारघडे यांनी केले आहे.

माजी आ. वाजेंचे मदतीचे आश्वासन

माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी जळालेल्या घराची पाहणी करुन कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी कुटुंबाला आश्वासन दिले. यावेळी तहसिलदार व गटविकास अधिकार्‍यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत शासन स्तराहून जास्तीत जास्त मदत करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

पाडळीच्या सरपंच सुरेखा रेवगडे व ग्रामसेविका सारिका बिडवे यांना वारघडे कुटुंबियांस नवीन घरकुल लवकरात लवकर मंजूर होणे कामी सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी नामदेव शिंदे, सरपंच सुरेखा रेवगडे, चंद्रभान रेवगडे, योगेश रेवगडे, संपत शिरसाट, तलाठी उषा कोलांडे, पोलीस पाटील परीघा पाटोळे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या