प्रशासकीय मान्यतेनंतरही फायलींना ब्रेक का?

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

फायलींच्या प्रवासावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत (general meeting of Zilla Parishad) प्रशासनाच्या कामाचे वाभाडे काढल्यानंतरही स्थायी समितीच्या बैठकीत (Standing Committee Meeting) फायलींच्या प्रवासावर वादळी चर्चा झाली.

शाळा खोल्या बांधकामांना (construction of school rooms) सहा महिन्यांपूर्वी प्रशासकीय मान्यता देऊनही अद्याप निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. प्रशासकीय मान्यता वेळेत होऊनही फायलींना ब्रेक का? असा मुद्दा उपस्थित करत भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे (BJP group leader Dr. Atmaram Kumbharde) यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

शिक्षण विभागांतर्गत (Departments of Education) शाळा खोल्या बांधकामाचा विषय मंजुरीला होता. शाळा खोल्यांना मार्च महिन्यात झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत (Education Committee Meetings) मंजुरी मिळाली आहे. मात्र, सहा महिने झाल्यावर आता निविदा काढल्या जात आहेत. इतका उशीर का, असा सवाल डॉ. कुंभार्डे यांनी बांधकाम विभागाला केला. प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर फायली पुढे काढल्या जात नसल्याचे त्यांनी निदर्शनास आनून दिले.

संबंधित कामांसाठी सदस्य अथवा ठेकेदार टेबलावरील सेवकांना भेटला की फाइल पुढे जाते, असा आरोपही त्यांनी केला. शिक्षण समितीने प्रशासकीय मान्यता तत्काळ दिलेल्या आहेत, बांधकाम विभागाकडून वेळाकाढूपणा केला जात असल्याचे शिक्षण सभापती सुरेखा दराडे (Education Speaker Surekha Darade) यांनी सांगितले. त्यावर सदस्यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. अध्यक्ष क्षीरसागर यांनीही, प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर फाइल दोन महिन्यांत फिरून निविदा, कार्यारंभ आदेश निघाले पाहिजेत. मात्र, प्रशासनाकडून हे होत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.

लोकांना भेटी द्या

बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता अभ्यागतांना भेटत नाही. त्यांच्याकडे शंभर ते दीडशे कामांचे प्रस्ताव तयार असूनही संबंधित ठेकेदारांना कार्यारंभ आदेश मिळत नसल्याची तक्रारी आहेत. अधिकारी ठराविक लोकांनाच भेटतात व काहींना टाळतात. त्यामुळे दिवसभर कार्यालयाबाहेर गर्दी असते. असे यापुढे करू नका, अशी अपेक्षा व्यक्त करीत कामाची पद्धत बदलण्याची सूचना डॉ.कुंभार्डे यांच्यातर्फे करण्यात आली.

५० लाखांच्या बिलांचा घाट ?

डॉ.कुंभार्डे यांनी, सेसअंतर्गत २०१६-१७ मध्ये मंजूर केलेली काही कामे अजूनही प्रलंबित आहेत का असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर बांधकाम विभाग एकचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांनी माझ्याकडे दोन फायली आल्या होत्या, मी त्या थांबवल्या आहेत, असे सांगितले. सेसची कामे सदस्य त्या वर्षातच पूर्ण करतात.

मात्र, ही जवळपास ५० लाख रुपयांची कामे पाच वर्षे प्रलंबित असण्याचे नेमके कारण काय? या कामांच्या दायित्वाला मंजुरी घेतली आहे काय, असा प्रश्न डॉ. कुंभार्डे यांनी उपस्थित केला. त्यावर सहायक लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळेयांनी यामुळेच आम्ही या कामांच्या फायलींवर आक्षेप घेतल्याचे सांगितले. डॉ. कुंभार्डे यांनी यावर प्रश्नांची सरबत्ती केली. याबाबत अध्यक्ष, उपाध्यक्षांसह इतर पदाधिकारी अंधारात असल्याचे दिसून आले. डॉ. कुंभार्डे यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी केली.

Share This Article