Friday, April 26, 2024
Homeजळगावvideo : देशदूत वारीचे अभंग...

video : देशदूत वारीचे अभंग…

प्रा .बी .एन .चौधरी

सत्वर ये हरी :

- Advertisement -

“”””””””””””””””””

मृदूंग रुसला,

टाळ मुके घरी.

स्वप्न झाली वारी,

पांडूरंगा.

कोपला का असा,

केली ताटातूट.

आता तुझी भेट,

जीव जाळी.

रिंगण टळले,

दर्शन दुर्लभ.

कर ते सुलभ,

विठूराया.

आठवतो देवा,

तुला मनामध्ये,

शोधी जनामध्ये,

रुप तुझे.

भना. म्हणे झालो,

बंदीवान घरी.

सत्वर ये हरी,

भेटावया !

© प्रा.बी.एन.चौधरी.

(९४२३४९२५९३)

- Advertisment -

ताज्या बातम्या