Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदेशदूत संवाद कट्टा : पाणी-बाणी

देशदूत संवाद कट्टा : पाणी-बाणी

देशदूत संवाद कट्टा : पाणी-बाणी

सहभाग :

- Advertisement -

प्रमोद गायकवाड,

राजेंद्र जाधव,

निशिकांत पगारे

निवेदन : डॉ. वैशाली बालाजीवाले, कार्यकारी संपादक, देशदूत

नाशिक | Nashik

सध्या नाशिकसह जिल्ह्यात कोरोनाचे सावट असून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे चित्र पहायला मिळते आहे. या पार्श्वभूमीवर देशदूतच्या शनिवार संवाद कट्ट्यात पाणीबाणी या विषयावर चर्चा करण्यात आली.

ग्रामीण भागातील भौगोलिक परिस्थिती अशी आहे कि येथे मोठ्या प्रमणावर पाणी पडतो. परतू हे पाणी वाहून जाते. हे पाणी अडवण्यासाठी उपाययोजना नसतात परिणामी डिसेंबर पासून या भागात पाणीटंचाईला सुरवात होते. स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्यात असलेली अनास्था पाणी टंचाईला कारणीभूत ठरत असते.

पाण्याचा प्रश्न आपण सोडवू शकलेलो नाही, तर शहरी भाग फक्त पाण्यावर मजा मारत असतो. त्यामुळे शासन स्तरावर योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापना संदर्भात अनेक योजना असताना दरवर्षी पाणी टंचाई समस्या नेहमीची झालेली दिसून येते. पाण्याची पातळी दिवसेदिवस खालावत आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या शहरे काँक्रिटीकरणयुक्त झाली आहेत. कमी जागा जास्त लोक ही संकल्पना शहरात रुजू झाली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढतो आहे. झाड कमी झाली. त्यामुळे शहरात होणार लोकसंख्या वाढ ही होऊन झाडांची संख्या वाढली पाहिजे. जेणेकरून पाणी पातळी वाढेल.

दरम्यान या चर्चेत सोशल नेट्वर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड, जलतज्ज्ञ राजेंद्र जाधव, गोदावरी वर काम करणारे निशिकांत पगारे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या