Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यादेशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : कृषी, जीवन मिशन - माधवराव...

देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : कृषी, जीवन मिशन – माधवराव बर्वे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

माधवराव बर्वे ( Madhavrao Barve ) हे निफाड ( Niphad ) तालुक्यातील कोठुर्‍याचे. त्यांनी तीन गोष्टी मनाशी ठरवल्या होत्या. 1) शेती कधी सोडायची नाही. 2) उसने कधी मागायचे नाही. 3) उधार कोणतीही वस्तू आणायची नाही.

- Advertisement -

वडिलोपार्जित सात एकर जमीन होती. सात एकर जमिनीवरून 60 एकर जमीन केली. ऑरगॅनिक फार्मिंग, वृक्षलागवड, माधव वन, नक्षत्रवन, मिक्सफूड गार्डन, सरस्वती वन, या विविध उपक्रमांची सुरुवात केली. सुरुवातीला सेंट्रल जेल, नाशिक येथे 15 हजार झाडांची लागवड केली.

आर्मी सेंटर, दिल्ली येथे नक्षत्रवन मिक्सफूड गार्डन, सरस्वती वन बनवले. मध्य प्रदेशात जबलपूर येथेही बेहडा घाटात नक्षत्रवन, मिक्सफूड गार्डन तयार केले. झारखंड या ठिकाणी मिलिटरीच्या विविध सेंटर परिसरातील जंगलांमध्ये जाऊन विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली. चिंचेची एक हजार झाडे लावण्याचे व्रत ते सध्या पूर्ण करताहेत. संपूर्ण आयुष्य शेतीला वाहून इतरांना प्रेरित करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या