Friday, April 26, 2024
Homeनगरउपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांची लाचलुचपतकडून चौकशी

उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांची लाचलुचपतकडून चौकशी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेवगावचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या विशेष पथकातील तीन पोलीस कर्मचार्‍यांविरूद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी उपअधीक्षक मुंढे यांची लाचलुचपत विभागाने कार्यालयात बोलवून चौकशी केली असल्याची माहिती उपअधीक्षक हरीष खेडकर यांनी दिली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचारी पसार झाले आहेत. त्यांच्या अटकेनंतर तपासाला गती मिळेल, असेही उपअधीक्षक खेडकर यांनी सांगितले.

- Advertisement -

एक वाळूची वाहतूक करणारी ट्रक उपअधीक्षक मुंढे यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकातील वसंत फुलमाळी, संदिप चव्हाण, कैलास पवार यांनी 7 एप्रिल रोजी पकडली होती. ती ट्रक कारवाई न करता सोडून देण्यासाठी आणि पुढे हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी या पोलिसांनी कंत्राटदाराकडे केली. मात्र, कंत्राटदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान वरील नमूद तिनही पोलिसांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 15 हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाच मागितल्याचा पुरावा एसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाल्यानंतर त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर हे पोलीस कर्मचारी पसार झाले आहेत. लाचलुचपत विभागाकडून त्यांचा शोध सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या