उपसभापतीकडून दूध संघाच्या संचालकास बेदम मारहाण

jalgaon-digital
2 Min Read

संगमनेर |प्रतिनिधी|Sangamner

खासगी मालकीच्या जागेतून रस्ता काढून दे, नाहीतर तुला संपवून टाकेन अशी धमकी देत संगमनेर पंचायत समितीचे (Sangamner Panchayat Samiti) उपसभापती नवनाथ अरगडे (Deputy Speaker Navnath Argade) यांनी संगमनेर दूध संघाचे संचालक विलास कवडे (Sangamner Milk Association Director Vilas Kawade) यांना बेदम मारहाण (Beating) करत जिवे मारण्याची धमकी (Threat) दिली. याप्रकरणी कवडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 6 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता नवनाथ अरगडे यांनी विलास साहेबराव कवडे यांना फोन करून आपल्या ऑफिसला बोलावून घेतले. अरगडे यांच्या कॅबिनमध्ये कवडे गेल्यावर नवनाथ अरगडे म्हणाले, तू गुंजाळवाडी शिवारात 3 आर क्षेत्र कोणाला विचारून खरेदी केले. माझे संमतीशिवाय या भागात कोणीही व्यवहार करू शकत नाही, असे म्हणून दमदाटी करण्यास सुरुवात केली. कवडे यांनी सांगितले की, सदर क्षेत्र मी खरेदी केलेले असून मालकीच्या जागेतून रस्ता देण्याचे कुठलेही कारण नाही, असे म्हणताच नवनाथ अरगडे यांनी विलास कवडे यांना पकडत शिवीगाळ करत धक्काबुक्की सुरू केली.

तू रस्ता कसा करून देत नाही हे बघतो, असे म्हणत कवडे यांचा गळा आवळला, तुला आत्ताच रस्ता करून द्यावा लागेल, नाही तर लगेच जेसीबी बोलावून तुला तेथेच जीवंत गाडतो तसेच तुझ्या संपूर्ण कुटुंबाला देखिल जिथे असतील तिथेच संपवून टाकतो, तुझा मर्डरच करतो, मी तालुक्याचा उपसभापती आहे, म्हणजेच मी तालुक्याचा मिनी आमदार आहे. माझे कुणीही करु शकत नाही, आत्तापर्यंत अनेकांना वाटी लावले आहे.

तुझे तर मी कामच करणार आहे, असा दम दिला. श्री. कवडे हे सदर ठिकाणाहून कसेबसे बाहेर पडले. याबाबत विलास कवडे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी नवनाथ धोंडीबा अरगडे (रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध अदखल पात्र गुन्हा रजिस्टर नंबर 1326/2021 भारतीय दंड संहिता 323, 504, 506 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

याबाबत फिर्यादी विलास कवडे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांच्याकडेही तक्रार केली आहे. तर तक्रारीच्या प्रती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महासंचालक यांनाही पाठविल्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *