Saturday, April 27, 2024
Homeनगरपोलिसांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव

पोलिसांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वार्षिक निरीक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांकडून पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस कार्यालय, पोलीस ठाणे आणि विशेष शाखांची दप्तर तपासणी केली जाणार आहे. यामुळे जिल्हा पोलीस दल कागदपत्रांच्या जुळवाजुळवीत व्यस्त झाले आहे. 10 जानेवारीपासून पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्याकडून जिल्हा पोलीस दलाची दप्तर तपासणी केली जाणार आहे.

- Advertisement -

पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हे, तपास, प्रलंबित गुन्हे, तक्रार अर्ज यासह विविध बाबींची तपासणी उपमहानिरीक्षकांकडून केली जाणार आहे. जिल्ह्याच्या गुन्हेगारीत वाढ झाली आहे. यामुळे काही विशेष उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान उपमहानिरीक्षक यांचा दौरा असल्याने प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. याशिवाय सर्वच कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे. तशा सूचना वरिष्ठांनी स्थानिक पोलिसांना दिल्या आहेत. पोलीस ठाण्यात अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कागदपत्रांची जुळवाजुळव करून फाईली तयार करण्याची घाई सुरू झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या