Friday, April 26, 2024
Homeनगरपशुसंवर्धन उपायुक्तांच्या बैठकीकडे पोल्ट्री कंपन्यांची पाठ

पशुसंवर्धन उपायुक्तांच्या बैठकीकडे पोल्ट्री कंपन्यांची पाठ

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात जिल्ह्यातील पोल्ट्री चालक-मालक संघटनेची प्रतिनिधी व खाजगी पोल्ट्री कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या बोलावलेल्या विशेष बैठकीकडे कंपनी प्रतिनिधींनी पाठ फिरवली. या खासगी कंपन्यांवर राजकीय व्यक्तींचा वरदहस्त आहे आणि यामुळेच या कंपन्या शासकीय अधिकारी व पोल्ट्रीफार्मर यांना जुमानत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची चर्चा यामुळे रंगली.

- Advertisement -

जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक संटघनेच्या विनंतीनुसार पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंभारे यांनी नुकतीच नगर येथे बैठकीचे आयोजन केले होते. परंतु कोणत्याच कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने व्यावसायिक संतप्त झाले आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. खासगी कंपन्या भांडवलशाहीच्या जोरावर शेतकर्‍यांना वेठीस धरून अन्यायकारक अटी लादुन पिळवणूक करतात असा आरोप उपाध्यक्ष प्रवीण धरम यांनी केला. पोल्ट्री व्यावसायिक सतीश शिंदे व संतोष दाते यांनी कंपनीकडून मिळणारे पक्षी व खाद्य खराब प्रतीचे आले, तरी यापासून होणार्‍या नुकसानीला जबाबदार धरून त्याची पूर्ण रक्कम फार्मरकडून वसूल करून घेतात, अशी कैफियत पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यासमोर मांडली.

या बैठकीस पांडुरंग पवार, बाळासाहेब देशमुख, गणेश झावरे, संकेत सुपेकर, संजय खिल्लारी यांनी कंपनीकडून होणार्‍या चुकीच्या गोष्टी उपायुक्त डॉ. तुंबारे यांच्यासमोर मांडून या शासन दरबारी पाठवण्याचे आवाहन केले. यावेळी अध्यक्ष सर्जेराव भोसले, सचिव राजू गजरे, कोषाध्यक्ष संतोष पानमंद, संचालक संतोष सुपेकर, नवनाथ राळे, स्वप्नील भोसले, गणेश झावरे, संजय खिलारे, धनंजय ढोकळे, अमोल नरवडे, पांडुरंग वाळुंज, रंगनाथ शिंदे, अनिल हिंगडे, अरविंद वाबळे, सल्लागार अड. संदीप शेंडकर, पांडुरंग पवार, रामदास ताठे, राजेश शेळके, संतोष दाते, किसन नरवडे, स्वप्निल रोडे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या