Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याKirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओवर निलम गोऱ्हे म्हणाल्या,...

Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओवर निलम गोऱ्हे म्हणाल्या, व्हिडिओ बघणं माझ्यासाठी..

मुंबई | Mumbai

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे या व्हिडिओचा मुद्दा सध्या पावसाळी अधिवेशनामध्ये(Monsoon Session) चांगला गाजत आहे. याच विषयावरुन विरोधकांनी सभागृहात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला असून याचे विधीमंडळात जोरदार पडसाद उमटायला सुरवात झाली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(State Home Minister Devendra Fadnavis) यांनी या विषयाची वरिष्ठ पातळीवरुन सखोल चौकशी होईल, असे जाहीर केले.

- Advertisement -

यावर प्रतिक्रिया देताना विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी ‘हा व्हिडिओ बघणं माझ्यासाठी खूप कठीण परीक्षा.’ असल्याचे मत व्यक्त केले आहे. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी अध्यक्षांना या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह देखील दिला. हा मुद्दा मांडल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च आणि सखोल स्तरावर चौकशी होईल अशी घोषणा केली.

UPA नाही तर आता INDIA… विरोधी ऐक्याचे नाव ठरले; काय आहे फुल फॉर्म?

त्यानंतर या मुद्द्यावर बोलताना निलम गोऱ्हे यांनी सांगितले की, ‘हा मुद्दा खूपच अस्वस्थ करणार आहे. चॅनेलवर घराघरामध्ये हे संपूर्ण शॉर्ट दाखवले जातात. घरातील मुले- मुली आणि बाकीची लोक असतात. त्यांच्यासमोर हे असे शॉर्ट वारंवार दाखवले जातात. त्यामुळे मी विनंती करते की आपल्याकडे येणारे व्हिडिओ ब्लर करा. असले व्हिडिओ दाखवताना थोडेफार बंधन ठेवा.’

विरोधकांच्या बैठकीवर PM मोदींचा हल्लाबोल; म्हणाले…

“पोलीस तपास होईल, त्यावेळी वाहिन्यांनी माहिती गोपनीय स्वरुपात द्यावी, जेणेकरुन पीडित महिलेपर्यंत पोहोचण शक्य होईल. तुम्ही पेनड्राइव्ह दिला, तो बघणे म्हणजे खूप कठीण परिक्षा आहे. पण, मी महिला पोलिस अधिकारी, महिला डॉक्टर यांना तो व्हिडिओ बघायला सांगून त्यांचे मत घेईन. हे तपासून त्यातून निघणार काय आहे?” असा सवाल निलम गोऱ्ंहे यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीसांचे सोमय्यांच्या त्या व्हिडीओवर महत्वाचे विधान ; म्हणाले, हा विषय..

तसंच, ‘सभागृहातील चर्चा ती महिला ऐकत असेल, तिला काय वाटत असेल तर तिने या सभागृहावर विश्वास ठेवावा. अनेक वेळा आपण सभागृहात बोलतो ते पीडीत महिला ऐकतात. ते एकून अनेक पीडित महिलांनी मला, फडणवीसांना संपर्क केला आहे. लोकांना अजूनही आमच्यावर विश्वास आहे ही मोठी गोष्ट आहे. जर या विश्वासाचा घात कुठे होत असेल तर त्यावर गृहमंत्र्यांनी जी चौकशी जाहीर केली आहे ती खूप मोठी गोष्ट आहे.’, असे देखील निलम गोऱ्हे यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या