Thursday, April 25, 2024
Homeनगरगैरव्यवहार करणार्‍या संचालकांच्या अटकेसाठी ठेविदारांचे उपोषण

गैरव्यवहार करणार्‍या संचालकांच्या अटकेसाठी ठेविदारांचे उपोषण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी संचालकांना अटक होत नसल्याच्या निषेधार्थ रावसाहेब पटवर्धन तथा प्रवरा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी

- Advertisement -

एसपी कार्यालयासमोर बुधवारी एक दिवसांचे लाक्षणीक उपोषण केले. साडेसहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गुन्हा ऑगस्ट 2020 मध्ये नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल आहे.

या गुन्ह्यात आजी माजी संचालकांसह तीस जणांचा आरोपी म्हणून उल्लेख आहे. ईस्माल गुलाब शेख यांनी पोलिसांत फिर्याद दिलेली आहे. मात्र, आरोपींचे राजकीय हितसंबंध आणि पैशाच्या ताकदीवर ते बिनधास्तपणे नगरमध्ये फिरत आहेत.

गुन्ह्यातील पुरावे व साक्षीदार नष्ट करण्याचे काम ते करत असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. दाखल असलेल्या गुन्ह्याचे तपासी पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली असल्याने आरोपी संचालकांना अटक होत नाही. परिणामी ठेवीदारांना व्याजासह ठेवीची रक्कम मिळत नाही.

ठेवीदारांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. फिर्यादी शेख यांना गंभीर आजार झाल्याचे निदान झालेले आहे. या आजाराच्या उपचारासाठी त्यांना पैशाची गरज आहे. त्यांना मुदत ठेवीची रक्कम मिळणे गरजेचे आहे.

आरोपींना अटक न झाल्यास लोकांचा कायद्यावर असलेला विश्वास उडून जाण्याची भीती आहे. कायद्याच्या राज्यात धोरणांची अंमलबजावणी करणे ही पोलिसांची जबाबदारीआहे. मात्र हेच काम इमानेइतबारे होत नसल्याचे ठेवीदारांनी आंशिक उपोषण केल्याचे सांगण्यात आले.

किसन शिंदे, दिलीप निसळ, टी.ई भंडारे, पी. पी.काळे, गणेश गुप्ता, रामकृष्ण परदेशी, सर्जेराव भामरे, फरहन शेख, प्रमोद खरमाळे, प्रमोद शहारे, अंजली खरमाळे, सूर्यभान साळुंके यांच्यासह ठेवीदार उपोषणास बसले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या