Friday, April 26, 2024
Homeधुळेठेविदारांची 23 लाखात फसवणूक, दोघांना अटक

ठेविदारांची 23 लाखात फसवणूक, दोघांना अटक

धुळे । Dhule । प्रतिनिधी

तालुक्यातील फागणे येथे पतसंस्थेच्या (Patsanstha) माध्यमातून ठेवीदारांची (depositors) तब्बल 23 लाखात फसवणूक (Cheating) करण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलिसात (police) 9 जणांवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी पतसंस्थेच्या खजिनदारासह दोघांना अटक (Arrested) केली आहे.

- Advertisement -

देवपूरातील बिजली नगरातील रहिवासी युवराज नथ्थु भामरे (वय 60) यांनी याबाबत तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फागणे (ता. धुळे) येथील श्री गुरूदेवदत्त पतसंस्थेचे (Shri Gurudevdatta Patsanstha) चेअरमन संगिता सुनिल पाटील, सचिव सुनिल गुलाबराव पाटील (मयत), खजिनदार योगेश्वर सुनिल पाटील, पुनम योगेश्वर पाटील, राहुल प्रभाकर पाटील, हर्षल विरभान पाटील, जयश्री रूपेश उर्फ मुकेश पाटील, रूपेश उर्फ मुकेश किसन पाटील, विनायक निंबा सुर्यवंशी सर्व (रा.फागणे) यांनी ही पतपेढी अधिकृत असल्याचे भासविले.

जादा व्याज (Excess interest) व परतावा देण्याचे आमिष (lure) दाखवून भामरे व इतर ठेविदारांकडून रोख रक्कम स्विकारून त्यांची पैसे भरल्याची कोणतीही पावती (Acknowledgment) न देता एका रजिष्टरमध्ये नावे नोंदवून घेतली. त्यानंतर मागणी करूनही पैसे (Money) परत दिले नाही. त्यांच्या घरी जावून पैशांची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देवून वेळ निभावुन नेली. त्यातच पतपेढीचे सचिव सुनिल पाटील हे दि. 18 फेब्रुवारी रोजी मयत झाले.

त्यानंतर पतसंस्थेच्या संचालकाकडे (director Patsanstha) देखील पैशांची मागणी केली. मात्र आजपर्यंत वायद्याप्रमाणे पैसे परत केले नाही. भामरे यांच्यासह गावातील इतर ठेवीदारांची 23 लाख 96 हजार रूपयात आर्थिक फसवणूक (Financial fraud) केली. दि. 1 एप्रिल 2020 ते दि. 15 एप्रिल 2022 दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी खजिनदार योगेश पाटील व विनायक सुर्यवंशी यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या