Saturday, April 27, 2024
Homeनगरकर्जत-जामखेडमधील 'हे' ९ सराईत गुन्हेगार तडीपार

कर्जत-जामखेडमधील ‘हे’ ९ सराईत गुन्हेगार तडीपार

जामखेड | तालुका प्रतिनिधी

कर्जत- जामखेड (Karjat-Jamkhed) या दोन तालुक्यातील नऊ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी डाॅ.अजित थोरबोले यांनी काढले आहेत. याबाबतचे आदेश प्रांताधिकारी डाॅ थोरबोले यांनी शुक्रवारी (दि.१५) जारी केले आहेत. (Deportation action)

- Advertisement -

कर्जत उपविभागांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणेकामी कर्जत व जामखेड येथील पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (च) अन्वये हद्दपार करणेसाठीचे प्रस्ताव कर्जतचे प्रांताधिकारी डाॅ. अजित थोरबोले यांच्या कार्यालयाला प्राप्त झाले होते. त्यानुसार प्रांताधिकारी डाॅ. थोरबोले यांनी कर्जत तालुक्यातील दोन व जामखेड तालुक्यातील सात अशा ९ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश जारी केले. या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. (Sarvamat News)

कर्जत तालुक्यातील विलास अवलुक्या काळे (कर्जत) व पद्मराज अर्जुन ढोणे ( मिरजगाव) या दोघांना अहमदनगर जिल्हा, बीड जिल्हयातील आष्टी तालुका, पुणे जिल्हयातील दौंड तालुका, सोलापूर जिल्हयातील करमाळा तालुक्यातुन ६ महिन्यांकरीता हद्दपार करण्यात आले आहे. (Sarvmat Crime News)

जामखेड तालुक्यातील महादेव रावसाहेब जायभाय (जायभायवाडी) यास एक वर्षांकरीता, पप्पु उर्फ ऋषिकेश मोहन जाधव (जामखेड), शरद गुलबशा भोसले (खांडवी), हनिफ आयुब कुरेशी (खर्डा), दिपक अशोक चव्हाण ( जामखेड), शरद उर्फ बंडु युवराज मुळे (सारोळा) यांना सहा महिन्यांकरीता व अविनाश भुजंग निकम (शिऊर) यास तीन महिन्यांकरीता अहमदनगर, बीड व उस्मानाबाद जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले आहे. (Sarvamat Breaking News)

या प्रस्तावांवर उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी चौकशी करुन अंतिम अहवाल उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्याकडे कारवाईसाठी पाठविले होते. त्यानुसार सदर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या