Thursday, April 25, 2024
Homeजळगावचाळीसगाव गुटखाप्रकरणात अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची विभागीय चौकशी

चाळीसगाव गुटखाप्रकरणात अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची विभागीय चौकशी

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

चाळीसगाव-मेहुणबारे रस्त्यावर 16 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला 55 लाख रुपये किमतीच्या गुटखा प्रकरणाबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी पथकावर गैरव्यवहाराचा आरोप करुन विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती.

- Advertisement -

या तक्रारीच्या अनुषंगाने या प्रकरणाची धुळ्याचे अपर पोलीस अधीक्षकांकडे विभागीय चौकशी सुरु असून गुरुवारी 15 जुलै रोजी तत्कालीन पोलीस निरीक्षक बापू रोहोम, मेहुणबारेचे तत्कालीन सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्यासह 9 जणांची चौकशी झाली. याप्रकरणात चाळीसगासचे आमदार मंगेश चव्हाण यांना सरकारी साक्षीदार करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

कर्मचार्‍यांचे निलंबन घेतले मागे

चाळीसगाव-मेहुणबारे रस्त्यावर 16 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने 55 लाख रुपयांच्या पकडलेल्या गुटखा प्रकरणात झालेल्या गैरव्यवहाराबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर दुसर्‍या दिवशी पोलीस प्रशासनाच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यातच पत्रकार परिषदेत घेतली होती.

दरम्यान, याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे व इतरांना पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी निलंबित केले होते. तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी या प्रकरणाची विभागीय चौकशीचे आदेश देऊन विभागीय चौकशी अधिकारी म्हणून धुळ्याचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांची नियुक्ती केली होती.

बच्छाव यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी असून आतापर्यंत पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून आमदार चव्हाण यांनाही सरकारी साक्षीदार करण्यात आलेले आहे. दरम्यान, या सर्वांचे निलंबन मागे घेण्यात आलेले आह

या कर्मचारी अधिकार्‍यांची दिवसभर चौकशी

गुरुवारी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सहायक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार नारायण पाटील, हवालदार रामचंद्र बोरसे, मनोज अशोक दुसाने, महेश पाटील, चालक प्रवीण हिवराळे, मेहुणबारेचे कॉन्सटेबल रमेश पाटील व मुख्यालयाचे नटवर जाधव यांची बच्छाव यांनी दिवसभर चौकशी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या