Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसामाजिक न्याय विभागाची 'या' विषयांसाठी पुण्यात कार्यशाळा

सामाजिक न्याय विभागाची ‘या’ विषयांसाठी पुण्यात कार्यशाळा

नाशिक | Nashik

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय (Ministry of Social Justice and Empowerment), भारत सरकार, तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य (Maharashtra) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

अनुसूचित जातींकरिता असलेल्या योजना, त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, नियम व कायदे (Laws) नागरीकांपर्यंत पोहचविण्यासाठी पुण्यात विचारमंथन होणार आहे. 

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

28 फेब्रुवारी व 1 मार्च 2023 रोजी आयोजित या क्षेत्रीय कार्यशाळेत 12 राज्यांच्या सामाजिक न्याय विभागाचे (Department of Social Justice) मंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, सचिव, आयुक्त, व संचालक इत्यादी अधिकारी सहभागी होत आहेत.

‘EVM थेट सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केले जाते’; ज्येष्ठ माजी खासदाराचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) तसेच सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री, भारत सरकार ए. नारायणस्वामी आणि रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचे उद्घाटन होत आहे. याशिवाय केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्री डॉ. विरेन्द्र कुमार हे आभासी माध्यमातून उपस्थितांना संबोधित करणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री दोन्ही दिवस उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनात ‘इतक्या’ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

- Advertisment -

ताज्या बातम्या