Saturday, April 27, 2024
Homeनगरअभ्यंगस्नानाला जलधारा

अभ्यंगस्नानाला जलधारा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ऐन दिवाळीचे अभ्यंगस्नान यंदा जलधारांसंगे करावे लागेल, असा नवा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेष म्हणजे परतीच्या पावसाचा मुक्काम आठवडाभर लांबला आहे. नव्या अंदाजामुळे पावसामुळे कंटाळलेल्या नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. राज्यात ऐन दिवाळीत पुन्हा एकदा जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. अंदमानमधील कमी दाबाच्या क्षेत्रापासून तमिळनाडू, केरळ ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उत्तर अंदमान समुद्रालगत 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. हे आज अजून तीव्र होण्याची शक्यता असून, ते उत्तरेकडे वळून पश्चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनार्‍याकडे जाण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणांसह नगर, पुणे, सातारा, कोल्हापूरमध्येही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. परतीच्या पावसाचा प्रवास नव्या अंदाजानुसार आठवडाभर लांबणीवर पडलाय. पुढील दोन दिवसांत मान्सून राज्यातून काढता पाय घेईल, असा अंदाज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या