विठुरायाच्या गजरात दुमदुमले चाळीसगाव

jalgaon-digital
3 Min Read

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांच्या माध्यमातून तालुक्यातील २५०० वारकर्‍यांना भुवैकुंठ पंढरपूर दर्शन (Pandharpur Darshan) व्हावे यासाठी (Special train) विशेष रेल्वे द्वारे मोफत प्रवासाचे (Free travel) आयोजन त्यांच्यावतीने करण्यात आले. या पंढरपूर वारीचा सोहळा चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वारकरी संप्रदायातील मान्यवर मंडळी, भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी- कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चाळीसगाव रेल्वे स्टेशन पर्यंत हजारो भाविकांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीची दिंडी काढण्यात आल्याने जय हरी विठ्ठलच्या व टाळ मृदंगाच्या जयघोषात चाळीसगाव नगरी दुमदुमून गेली होती. तब्बल दोन वर्षानंतर पंढरपूर येथील लाडक्या विठुरायाचे दर्शन वारकर्‍यांना घडणार असल्याने त्यांच्या भावभक्तीला देखील उधाण आले होते.

आमदार मंगेश चव्हाण यांचा कुटुंबियांसह पंढरपूर पर्यंत रेल्वेने प्रवास-

आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चाने वारकर्‍यांसाठी २४ डब्यांची विशेष स्लीपर ट्रेनच यासाठी बुक केली असून तिला गिरणाई नाव देण्यात आलं आहे. ही गिरणाई ट्रेन दि.२ जुलै रोजी संकाळी पंढरपूर येथे पोहचणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः सह धर्मपत्नी व शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.प्रतिभा चव्हाण, वडील रमेशनाना आणि कमलबाई यांच्यासह रेल्वेने पंढरपूर पर्यंत प्रवास केला. सर्व २४ डब्यातील भाविकांशी संवाद साधत त्यांनी आणलेली चटणी भाकरी खाल्ली तसेच भजनात देखील सहभागी झाले. पंढरपूर येथे सर्व २५०० भाविकांच्या चहा-नाष्टा- दोन वेळेचे जेवणाची सोय, चंद्रभागा स्नान, विठ्ठल मंदिर दर्शन घडविले जाणार आहे. तसेच त्याच दिवशी रात्री ही विशेष गिरणाई ट्रेन रात्री १० वाजता पंढरपूर येथून भाविकांना घेत परत निघणार असून दि.३ जुलै रोजी सकाळी ९ वाजता चाळीसगाव येथे पोहोचेल. चाळीसगाव तालुक्याची जीवनदायी गिरणाई विशेष ट्रेन ही हजारो चाळीसगाव वासीयांना चंद्रभागेचे दर्शन घडवणार असल्याने म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही.

हजारो वारकरी मायबापांचा पुंडलिक झालो हे माझं भाग्य-आ. मंगेश चव्हाण

जवळपास २५०० हुन अधिक वारकरी मायबापांचा पुंडलिक होण्याचं सौभाग्य मला श्री विठ्ठलाच्या आशिर्वादाने प्राप्त झाले आहे. राजकारण करत असताना स्वार्थापेक्षा परमार्थाला मी जास्त महत्व देतो, समाजातील सज्जनशक्ती टिकवून ठेवायची असेल तर त्यासाठी अध्यात्म आणि संतांची संगत आवश्यक आहे. त्यामुळे ही पंढरपूर वारी आयोजित केली असून चाळीसगाव तालुक्यातील १५० गावातील २५०० वारकरी यात सहभागी झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. ज्या वारकरी मायबापांना यावर्षी पंढरपूर दर्शनाची संधी मिळाली नाही त्यांना पुढील वर्षी प्राधान्य दिले जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगीतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *