Friday, April 26, 2024
Homeनाशिकदेवळाली कॅन्टोमेन्ट बोर्डास रक्षा मंत्री पुरस्कार घोषित

देवळाली कॅन्टोमेन्ट बोर्डास रक्षा मंत्री पुरस्कार घोषित

देवळाली कॅम्प । Deolali Camp

डायरेक्टर जनरल डिफेन्स इस्टेट च्या वतीने देशभरातील कॅन्टोमेन्ट बोर्डाने कोविड काळात केलेल्या कामगिरी ची दखल घेऊन 3 कॅन्टोमेन्ट बोर्डास रक्षा मंत्री पुरस्कार जाहीर केला आहे. त्यात देवळाली कॅन्टोमेन्ट बोर्ड व हॉस्पिटल चा समावेश आहे.

- Advertisement -

आज (दि.१६) रोजी ऑनलाइन पुरस्कार सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी दिली.

कॅन्टोमेन्ट बोर्डाचे वतीने कोविड काळात नागरिकचे आरोग्यासाठी केलेले काम, तसेच पुरविण्यात आलेल्या सुविधा,घेतलेली काळजी, या बाबत माहिती घेण्यात आली. त्यानुसार देशभरातील कॅन्टोमेन्ट मध्ये पुणे कॅन्टोमेन्ट बोर्ड व सरदार वल्लभभाई पटेल जनरल हॉस्पिटल, खडकी कॅन्टोमेन्ट बोर्ड व डॉ बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटल व देवळाली कॅन्टोमेन्ट बोर्ड व जनरल हॉस्पिटल यांचा समावेश आहे. आज (दि.१६) रोजी डिजीडीई कार्यलय ,नवी दिल्ली यांचे वतीने ऑनलाइन पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी दिली.

देवळाली कॅन्टोमेन्ट बोर्ड व जनरल हॉस्पिटल यांनी कोविड काळात डॉक्टर, नर्सेस, वाडबॉय, आशा सेविका, सफाई कर्मचारी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व नगरसेवक यांनी केलेले काम यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. देवळाली कराणसाठी ही बाब अभिमानस्पद आहे

– सचिन ठाकरे,उपाध्यक्ष, कॅन्टोमेन्ट बोर्ड, देवळाली

- Advertisment -

ताज्या बातम्या