Thursday, April 25, 2024
Homeनाशिक५५ विनामास्क धारकांवर देवळ्यात दंडात्मक कारवाई

५५ विनामास्क धारकांवर देवळ्यात दंडात्मक कारवाई

देवळा | विशेष प्रतिनिधी

देवळा शहरासह तालुक्यात पुन्हा कोरोनाने वरती डोके काढले असून, कोरोनाचे नवीन रुग्ण सापडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे कलम १८८ अन्वये देवळा शहरात विना मास्क फिरणाऱ्यावर पोलीस प्रशासन व नगरपंचायतीने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

- Advertisement -

काल (दि. २२) ५५ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढेही दंडात्मक कारवाई सुरूच राहणार असल्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन केल्याशिवाय गत्यंतर नाही अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी दिली आहे.

कोरोनामुक्त असलेल्या देवळा शहरात गतवर्षी २८ जूनपासून कोरोनाचे रूग्ण सापडण्यास सुरूवात झाली. परंतु महसुल विभाग, नगरपंचायत प्रशासन, व आरोग्य विभागाने पोलिसांची मदत घेत तातडीने पाऊल उचलले.

देवळा शहरातील कोरोना रूग्ण सापडलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करून सील केला. अशीच कारवाई ग्रामीण भागात देखील करण्यात आली होती. मास्क, सामाजिक अंतर, स्वच्छता आदी गोष्टींचे कटाक्षाने पालन करण्याबाबत प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरीकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळाले व तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या मर्यादित राहून मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याचा धोका टळला होता.

त्यातच तालुक्यात पुन्हा कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून यायला सुरवात होताच कोरोना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक धोरण अवलंबले असून देवळा नगरपंचायत व पोलिसांनी सयुक्तिक पणे कारवाई करत तोंडाला मास्क नसलेल्या २६ व्यक्तिंवर दि. २१ रोजी गुन्हे केले. तर काल दि. २२ रोजी पुन्हा ६० व्यक्तींवर कारवाई करत ५५ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी दिली.

कोरोना संसर्गापासून स्वतःचा व आपल्या कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे , मुख्याधिकारी संदीप भोळे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या