Friday, April 26, 2024
Homeनाशिकराज्यपालांच्या हस्ते पार पडणार भूमिपूजन सोहळा

राज्यपालांच्या हस्ते पार पडणार भूमिपूजन सोहळा

सटाणा | तालुका प्रतिनिधी

येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक नूतनीकरण या ऐतिहासिक कामाचे भूमिपूजन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनिल मोरे यांनी दिली.

- Advertisement -

दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिराजवळ असलेल्या महाराजांच्या ऐतिहासिक तत्कालीन कचेरी येथे आयोजित समारंभाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेतील पत्रकार परिषदेत बोलतांना मोरे यांनी देवमामलेदार यशवंतराव महाराजांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या लोकाभिमुख कार्यातून मानवास देखिल देवत्व प्राप्त होते, असा आदर्श समाजाला दिला.

संपूर्ण देशामध्ये शासकीय अधिकाऱ्याचे एकमेव मंदिर असलेल्या सटाणा शहरात देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारकाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीसाठी इतिहासाचे जतन संवर्धन करण्याच्या उद्देशाने नूतनीकरणाचे काम करण्यात येत आहे.

सदर जागेवर यापूर्वी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे तालुक्यात मळगाव येथे स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेपासून शहरातील देवमामलेदार स्मारकाच्या नूतनीकरणापर्यंत प्रदीर्घ काळ शासनस्तरावर पाठपुरावा केल्यानंतर स्मारकासाठी एकुण ३ कोटी ८० लाख ८० हजार रुपये निधी शासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे. तसेच कामाची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. आगामी नऊ महिन्याच्या कालावधीत स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह कृषी मंत्री दादाजी भुसे,पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खा.डॉ. सुभाष भामरे, माजी पर्यटनमंत्री आ. जयकुमार रावल,आ.दिलीप बोरसे,नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, नगरपरिषद संचालक किरण कुलकर्णी, आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या