Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedदातांची निगा राखणे तितकेच गरजेचे  

दातांची निगा राखणे तितकेच गरजेचे  

लहानपणापासून आपल्याला दातांची निगा राखण्याचे संस्कार दिले जातात. सकाळी उठल्यावर, रात्री झोपण्याआधी ब्रश करावा असे आपल्या पालकांनी सांगितलेले असल्याने आपले दात स्वच्छ, सुंदर आणि मोत्यांसारखे दिसतात.

आजघडीला आपण दात दुखायला लागल्यावरच डेंटिस्टकडे जातो असे नाही. दात स्वच्छ करणे, पॉलिश करणे यासह दातांच्या विविध समस्यांसाठीही आपल्याला डेंटिस्टकडे जावे लागते. मुंबई-पुण्याच्या धर्तीवर औरंगाबादमध्येही एकापेक्षा एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर डेंटिस्ट करताना पाहायला मिळतात.

- Advertisement -

आजघडीला औरंगाबादमध्ये असंख्य अनुभवी डेंटिस्ट आहेत. आधीच्या काळात रुग्ण दाढदुखीनंतर डेंटिस्टकडे जात असत. आता दात स्वच्छ करणे, दात निखळत असल्यास त्याला रूट कॅनॉलच्या माध्यमातून वाचवणे, वेडेवाकडे दात एका रेषेत आणण्यासाठी स्माईल डिझायनिंग, दात लॅमिनेट करणे, दाताला कॅप बसवणे, इंट्रा ओरल स्कॅनरच्या माध्यमातून दातांची स्कॅनिंग करून कवळी तयार करणे यासारख्या कितीतरी अत्याधुनिक सुविधा आपल्या शहरात दिल्या जात आहेत.

आजकाल ‘वन दे डेंटस्टी’ ही अभिनव अशी सेवा आपल्या शहरात नव्याने दिली जात आहे. याशिवाय ‘कॅड कॅम टीथ’ यासारखी सेवाही येथे उपलब्ध आहे. नैसर्गिकदातांप्रमाणेच दिसणारे आणि मजबूत असणारे दात तयार करण्यासाठी सिरॅमिकचा वापर केला जातो.

यामध्ये विविध रंगछंटादेखील निवडता येतात. दात बनवण्यासाठी आधी मोल्ड तयार केला जातो आणि दाताच्या आकाराबाबत खात्री झाल्यानंतर अंतिम माध्यम वापरून कृत्रिम दाताची निर्मिती केली जाते. विविध माध्यमांप्रमाणेच ‘कॅड-कॅम’चादेखील आधार दात तयार करताना केला जातो.

जगभरातल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास भारतामध्ये केले जाणारे दातांवरचे उपचार महाग नाहीत. उलट आजकाल भारतात ‘डेण्टल टूरिझम’ या संकल्पनेखाली परदेशातून पर्यटक खास दातांवरच्या उपचारासाठी येतात.

याचं कारण भारतात अत्यंत माफक दरात दंतउपचार उपलब्ध आहेत. आज विचार केला, तर आपल्या लक्षात येईल, की भारतातला जवळपास प्रत्येक माणूस दातांच्या लहान-मोठ्या विकारांनी त्रस्त आहे. त्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे दातांकडे केलेले दुर्लक्ष.

वर्षातून दोन वेळा डॉक्टरांना दात दाखवून साफ करून घ्यावेत, असा सल्ला डॉक्टर कायम देत असतात. या दुर्लक्षामुळे पुढे हिरड्यांचे आजार बळावतात आणि दात किडतात. दातांचं किडणं या व्याधीकडे फार लक्ष दिलं जात नाही. जेव्हा दात दुखण्यास सुरुवात होते, त्यावेळी डॉक्टरची आठवण होते; कारण तेव्हा पर्याय नसतो. तोपर्यंत दाताची कीड ही खोल पोहोचलेली असते. त्यावेळी रूट कॅनाल ही ट्रिटमेण्ट करावी लागते.

काही लोक या दातदुखीकडेही दुर्लक्ष करतात. दुखऱ्या दातांसाठी ते पेनकिलरसारखी औषधं घेतात आणि कामाला लागतात. या कामचलाऊ उपचारांमुळे दातांचे नुकसान होते. दात पूर्णपणे किडतो. आता तो दात काढण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरत नाही. या दाताऐवजी कृत्रिम दात लावता येतो; पण कृत्रिम दातांना नैसर्गिक दातांसारखी ताकद येत नाही.

दातांबाबत झालेल्या संशोधनातून असं पुढे आलं आहे, की दातांचं आरोग्य चांगलं नसेल तर मधुमेह, हृदयविकार यांसारख्या व्याधीमुळे होणारे त्रास वाढतात. माणसाच्या दाताची किंमत ही एखाद्या चेहऱ्यापेक्षाही जास्त आहे.

याचं कारण असं, की माणसाचं स्वास्थ्य हे तो घेत असलेल्या आहारावर अवलंबून असते. तोंडात दात नसतील, तर चांगल्या स्वास्थ्यासाठी लागणारा आहार घेणं दुरापास्त होतं. अशावेळी ही दातांची गरज कवळी, ब्रिजेस, कृत्रिम दात यांसारखे उपचार करून सोडवले जातात. तेव्हा दातांची काळजी घ्या. दातांची स्वच्छता राखा आणि दात किडले असल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांना भेटा

- Advertisment -

ताज्या बातम्या