Wednesday, April 24, 2024
Homeजळगावव्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे लोकशाही दिनाचे आयाेजन

व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे लोकशाही दिनाचे आयाेजन

जळगाव – Jalgaon

महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतु सद्यस्थितीत राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे.

- Advertisement -

विषाणूचा प्रादुर्भाव संसर्ग प्रतिबंधाासाठी लॉकडाऊन कालावधीत तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीय आयुक्त स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन दूरदर्शन व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आयोजन करण्याचे निर्देश राज्य शासन स्तरावषन देण्यात आले आहेत.

त्यानुसार सोमवार दि. १ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी दुरदर्शन व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी नागरिकांनी स्थानिक तालुक्यातील तहसिल कार्यालयात वेळेवर उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या