Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमीटर बॉक्सला झाकण लावण्याची मागणी

मीटर बॉक्सला झाकण लावण्याची मागणी

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणामध्ये विद्युत पोलवरील मीटर बॉक्सला झाकण लावण्याच्या मागणी सहाय्यक आयुक्त नवीन नाशिक मनपा विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisement -

भुजबळ फार्म नजीक स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यानात विद्युत पोलवरील मीटर बॉक्स हे उघड्यावर असून या उघड्या मीटरमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता उद्यानामध्ये आहे. या उद्यानात लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिक येत नियमित फिरत असतात.

येथील मीटर बॉक्स उघडे असल्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. लवकरात लवकर या उघड्या मीटर बॉक्स ला झाकण लावण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते कैलास चुंबळे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या