Wednesday, April 24, 2024
Homeनगरमंदिरे सोमवारपासून सुरु न झाल्यास राज्यभर आंदोलन

मंदिरे सोमवारपासून सुरु न झाल्यास राज्यभर आंदोलन

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

श्रावण महिन्यातल्या तिसर्‍या सोमवार (Monday) पासून राज्यातील सर्व मंदिरे (State All Temple) सुरू न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन (Statewide Movement) करण्यात येईल असा इशारा (HInt) भारतीय जनता पक्षाच्या अध्यत्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (State President of BJP Spiritual front Acharya Tushar Bhosale) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

- Advertisement -

आचार्य भोसले (Acharya Tushar Bhosale) हे आज संगमनेरमध्ये (Sangamner) आले होते. शहरातील विविध मंदिरात (Temple) जाऊन त्यांनी आरती केली त्यानंतर शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेतून ते बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले तालुकाध्यक्ष अशोक इथापे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीराज डेरे, योगराज परदेशी, बबनराव मुठे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. भोसले पुढे म्हणाले, करोनामुळे (Covid 19) संपूर्ण राज्यात सर्व व्यवहार बंद होते. हळूहळू सर्व सुरू होत आहे. दारूचे दुकाने (Alcohol Shop) सुरू करणारे राज्यातील आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) मंदिर मात्र सुरू करत नाही. सरकारने याबाबत त्वरीत पावले उचलावीत. मंदिरे सुरू (Temple Open Demand) न झाल्यास सर्व नियम तोडून मंदिरे उघडले जातील आणि भाविक या मंदिरात प्रवेश करतील असा इशारा त्यांनी दिला. दारूपासून महसूल मिळत असतो म्हणून ही दुकाने सुरू केली.

मोठ्या मंदिरापासूनही मोठा महसूल जमा होत असतो. शिर्डी (Shirdi) येथील साई संस्थान (Sai Trust) मधून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. जिल्ह्यातील सर्व मंत्र्यांना मंदिराबाबत काही घेणे देणे नाही. त्यांचे लक्ष फक्त वसुलीकडे आहे. सोमवारपासून मंदिरे सुरू न झाल्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil), विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान सकाळी भोसले यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मंदिर प्रवेश केला.

संगमनेरमध्ये (Sangamner) येऊन शहरातील गुरुद्वारा, मोठे मारूती मंदिर, सोमेश्वर मंदिर, साई मंदिर (Sai Temple) या ठिकाणी आरत्या केल्या. देवगड (Devgad) येथील खंडोबा मंदिरात दर्शन घेतले. यावेळी ज्येष्ठ नेते राम जाजू, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीराज डेरे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिनेश सोमाणी, तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस योगराज परदेशी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे, श्रीरामपूरचे बबनराव मुठे, भारत गवळी, काशिनाथ पावसे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शैलेश फटांगरे, राजाराम लांडगे, सोमनाथ नेहे, कार्यालय सचिव विकास गुळवे, केशव दवंगे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या