Friday, April 26, 2024
Homeनगरमनपा पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करावा

मनपा पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करावा

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका कर्मचारी पतसंस्थेत वस्तू कर्जवाटपात 45 लाख रुपयांचा अपहार झाला असून, सभासदांची फसवणूक करणार्‍या चेअरमन, व्हा.चेअरमन बाबा मुदगल व संबंधित ज्वेलर्स बेद्रे विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संस्थेच्या सभासदांनी केली आहे.

यासंदर्भात संस्थेचे सभासद विजय चव्हाण, संजू उमाप, सोमनाथ गायकवाड, मच्छिंद्र साबळे, साहेबराव बोरगे, संजय बोरगे, विजय घोरपडे, ज्ञानेश्वर मगर, देवीदास जाधव, वसंत कांबळे, शाम घोरपडे, विजय ठोकळ यांच्यासह सभासदांनी जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन दिले आहे.

- Advertisement -

त्यात म्हटले आहे की, मनपा कर्मचारी पतसंस्थेत सभासदांना वस्तू कर्जवाटप सुरू झाल्याने कर्मचार्‍यांनी वस्तू कर्जासाठी मागणी केली. पतसंस्थेत सरसकट सर्व वस्तू कर्ज संबंधित ज्वेलर्स यांच्याकडे घेण्याची सक्ती केली. मंजूर कर्ज रु. 90,000 रकमेपैकी 13,000 कापून घेऊन सभासदास रु. 77,000 रोख दिले गेले. वस्तू घेण्यासाठी दुसर्‍या दुकानाचे कोटेशन घेऊन येतो म्हणालो तर कर्ज मिळणर नाही असे सुनावले. मंजूर रकमेतील 13,000 रुपये कशाचे वजा करता अशी विचारणा केली तर उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्ज देण्यास नकार दिला जातो. सोन्याच्या वस्तूवर जीएसटी कर हा 3% असून, 90,000 वर 3% प्रमाणे 2700 रु. टॅक्स लागत आहे. तसे न करता 13,000 रु. हे संस्थेचे चेअरमन आणि व्यवस्थापक व व्हाईस चेअरमन यांनी संगनमताने सभासदांची आर्थिक लूट केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या