कर्ज फेडण्यासाठी माहेरहून 1 लाख रुपयांची मागणी; पती व सासूकडून विवाहितेचा छळ

राहाता |वार्ताहर| Rahata

कर्ज फेडण्यासाठी माहेरहून एक लाख रुपयांची मागणी करत पती व सासूकडून विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात पती व सासूविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुराधा सागर जाधव (वय 31) हिचे 2015 साली सागर संजय जाधव राहणार दिवा गाव जिल्हा ठाणे यांच्यासोबत लग्न झाले. तो पण मूकबधिर असून त्याला बोलता येत नाही. तो सांताक्रूझ येथे रोजंदारीवर काम करतो. लग्नानंतर काही महिन्यातच पती सागर जाधव याला जुगार खेळण्याची सवय असल्याचे लक्षात आले. घर खर्चासाठी घरी पैसे का देत नाही हे विचारणा करीत असे. तो मला आमच्या सांकेतिक भाषेत शिव्या देत लाथाबुक्क्यांनी मारहाण करायचा. सासू सुनीता संजय जाधव पण नवर्‍याची बाजू घेऊन मारहाण करत असे.

तू आम्हाला पसंत नाही, तुला काम येत नाही, तुझ्याबरोबर लग्न करून फसलो आहे. कर्ज फेडण्यासाठी तुझ्या भावाकडून एक लाख रुपये घेऊन असे म्हणत त्रास देत असे. त्यांना सांकेतिक भाषेत माझा भाऊ गरीब आहे. त्यांच्याकडे पैसे नाही असे अनेकदा सांगितले परंतु ते ऐकत नसे. मी माझ्या फोनवरून पती व सासू कडून होणार्‍या त्रासाबाबत भाऊ सिद्धार्थ अशोक निकाळे याला मेसेज करून माहिती दिली. त्यानंतर तो तात्काळ आमच्या घरी ठाणे येथे आला व माझ्या बहिणीला त्रास का देतात याची विचारणा पती व सासू यांना केली. तुझ्या बहिणीने तुला पैशाबाबत सांगितले नाही का? तुझ्या बहिणीला घेऊन जा पैसे घेऊनच तिला परत घेऊन ये. माझा भाऊ मला राहाता येथे माहेरी घेऊन आला.

त्यानंतर भावाने अनेकदा सासरच्या मंडळींना फोन करून मला सासरी नांदण्यासाठी पाठवायचा प्रयत्न केला; परंतु पती व सासू मला नांदवायला तयार नाहीत. म्हणून आम्ही पोलीस अधीक्षक अहमदनगर दिलासा सेल येथे तक्रार केली परंतु पती व सासू चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे राहाता पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी अनुराधा जाधव हिने राहाता पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी पती सागर संजय जाधव व सासू सुनीता संजय जाधव यांच्या विरुद्ध भा. दं. वि. कलम 498, 323, 504, 506, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *