Friday, April 26, 2024
Homeनगरबाजार फुलला...फुलला !

बाजार फुलला…फुलला !

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध प्रकारचे आकर्षक आकाशकंदील, पणत्या, खतावण्या विक्रीस आल्या आहेत.

नवीन कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. करोनामुळे अनेक दिवसांपासून घरात असलेले नागरिक आता खरेदीसाठी बाहेर पडल्याने बाजार फुलला आहे.

- Advertisement -

शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांकडून विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. बाजारपेठेत चिनी मालापेक्षा भारतीय बनावटीच्या वस्तूंना अधिक मागणी आहे. बाजारात पर्यावरणपूरक हॅण्डमेड व कापडी आकाशकंदील विक्रीस आले आहे. कापडी आकाशकंदील साधारणत: 70 पासून पुढे उपलब्ध आहेत.

त्यात घुमट, चौकोनी, गोलाकार, दिवे आदी प्रकारांचा समावेश आहे. प्लाास्टिक फायर बॉलही लक्ष वेधून घेत आहे. चांदणीच्या आकारातील आकाशकंदील 50 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत आहेत. आकाशकंदिलाच्या लहान दिव्यांची माळ 40 रुपये डझनाने उपलब्ध आहे.मातीच्या पणत्या 50 ते 70 रुपये डझन या दराने विक्रीस आहे.

कुंदन, टिकली, सिरॅमिक वर्क असणार्‍या पणत्या शंभर रुपयापासून 120 रुपये नगाप्रमाणे आहे. याशिवाय मेणा, फ्लोटिंग, सुगंधी आदी विविध प्रकारातील पणत्या 55 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत आहे. बाजारात ङ्गमॅजिक लॅम्पफ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आकाशकंदील, पणत्यांच्या किमतीत 20 ते 25 टक्के वाढ झाल्याची माहिती विक्रेते राकेश पवार यांनी दिली.

खतावणी व रोजमेळ, रोजनिशीला मागणी वाढली आहे. बाजारात तळहाताच्या आकारातील खतावण्यांपासून वेगवेगळ्या आकारातील खतावण्या उपलब्ध आहे. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी ग्राहक कमी आवाजाच्या फटाक्यांना पसंती देतात. या पार्श्वभूमीवर कमी आवाजाचे फटाके विक्रीस आले आहे.

रांगोळी काढण्यासाठी लागणार्‍या विविध वस्तूंनी बाजारपेठ फुलली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, जामनेर रोड, यावल रोड आदी भागांमध्ये विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. बाजारात 20 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंत स्टीकर, चाळणी, साचे विक्रीस आले आहेत. त्यात अनेक प्रकारही उपलब्ध आहे. तसेच पांढरी रांगोळी 10 रुपये किलो तर रंगीत रांगोळी 15 रुपये किलो दराने किंवा 10 रुपये पुडी या प्रमाणे विक्री होत आहे.

लॉकडाऊनमुळे यंदा व्यापारी व विक्रेत्यांनाच पूर्ण क्षमतेने माल मिळाला नाही. कोरोना लॉकडाऊनमुळे वस्तूंचे उत्पादन कमी झाले. सध्या चायनाचा माल बाजारात नाही. गेल्या वर्षाचा काही माल आहे, मात्र त्यालाही मागणी नाही. नागरिक 200 ते 450 रुपयांपर्यंतची लायटिंगची देखील मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचे चित्र आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या