Wednesday, April 24, 2024
Homeनगररेमडेसिवीर औषधाची मागणी

रेमडेसिवीर औषधाची मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात करोना संसर्गाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यात उपचारादरम्यान रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले.

- Advertisement -

या आजारातील रुग्णांना श्वसनाचा अधिक त्रास होतो. यावर प्रभावी उपचार म्हणून रेमडेसिवीर औषध प्रभावी ठरते. जिल्ह्यातील या औषधाचा साठा संपला आहे. त्यामुळे तो तत्काळ मिळावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. आमदार जगताप यांनी आरोग्यमंत्री टोपे यांची मुंबई येथे भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.

जगताप म्हणाले, जिल्हा शल्यचिकित्सकांनी रेमडेसिवीर औषध साठा संपल्याचे सांगितले आहे. खाजगी रुग्णालयांकडे देखील हे औषध उपलब्ध नाही. हे औषध करोना रुग्णांसाठी प्रभावी ठरते. या औषधासाठी संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते.

रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी हे औषध गरजेचे असून, ते तत्काळ मिळावे. याशिवाय राज्यातील इतर जिल्ह्यांना मोठ्याप्रमाणात रेमडेसिवीर हे औषध मिळते. त्या तुलनेत हे औषध अहमदनगर जिल्ह्याला मिळत नाही. याकडे देखील आमदार जगताप यांनी लक्ष वेधले. आरोग्यमंत्री टोपे यांनी या निवेदनाची दखल घेत आरोग्य विभागाचे सचिव यांना तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या