Saturday, May 11, 2024
Homeनाशिक'त्या' हॉटेलवर गुन्हा नोंदवण्याची मागणी

‘त्या’ हॉटेलवर गुन्हा नोंदवण्याची मागणी

इंदिरानगर । Indiranagar (वार्ताहर)

पाथर्डी फाटा भागातील एका नामांकित हॉटेलमध्ये कथितरीत्या डांबून ठेवलेल्या युवक-युवती प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित हॉटेल व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे बाळा दराडे यांनी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दराडे यांना या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलीस उपायुक्त विजय खरात आणि वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मदतीने या सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची सुटका केली. या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ मेसेजेसद्वारे आपल्याला मारहाण झाल्याचे आणि डांबून ठेवल्याची गंभीर तक्रार केली आहे.

दराडे यांच्याशीदेखील एका युवतीने संभाषणात कैफियत मांडली. मात्र पोलिसांनी सुटका केल्यानंतर आम्हाला घरी जायचे आहे, काहीही तक्रार नाही, असा पवित्रा त्या सर्वांनी घेतल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.

मात्र परप्रांतीय असल्याने आणि त्यांच्यावर दबाव असल्याने त्यांनी अशी भूमिका घेतली असेल.

मात्र झालेला प्रकार हा गंभीर असून या हॉटेलची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी दराडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आता पोलीस आयुक्त या प्रकरणाबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या