Saturday, April 27, 2024
Homeनगरअवघड क्षेत्रातील सेवा बदलीस ग्राह्य धरण्यासाठी मार्गदर्शन मागवा

अवघड क्षेत्रातील सेवा बदलीस ग्राह्य धरण्यासाठी मार्गदर्शन मागवा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करतांना सध्या अवघड क्षेत्रात असणार्‍या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सेवा बदलीसाठी ग्राह्य धराण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन मागावे व मगच अवघड क्षेत्र जाहिर करावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.

- Advertisement -

ग्रामविकास विभागाच्या फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी धोरण निश्चित करण्यात आले होते. त्यामधील अवघड क्षेत्र घोषित करण्याच्या निकषानुसार, मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा घोषित केल्या होत्या. त्याप्रमाणे गेल्या दोन वर्षापासून अवघड क्षेत्रात काम करणार्‍या शिक्षकांना बदलीत प्राधान्य क्रम मिळाला आहे. यावर्षी शासनाने बदल्या बाबत सुधारित धोरण तयार केले असून अवघड क्षेत्राचे निकष बदलण्यात आलेले आहेत.

नवीन निकषानुसार यापूर्वी अवघड क्षेत्रात असलेली शाळा सुधारीत बदली धोरणातील निकषानुसार सर्वसाधारण क्षेत्रात येऊ शकते. मात्र, यापूर्वीच्या घोषित करण्यात आलेल्या अवघड क्षेत्रात ज्या प्राथमिक शिक्षकांनी आजअखेर सलग तीन वर्ष सेवा केलेली आहे, त्या शिक्षकांच्या अवघड क्षेत्रातील सेवेबाबत, त्यांची ती सेवा अवघड क्षेत्रात धरावयाची किंवा नाही. तसेच त्यांना बदली अधिकार पात्र शिक्षक समजून बदली मध्ये प्राधान्य द्यावे किंवा कसे, याविषयी सुधारीत शासन निर्णयामध्ये कुठलीही स्पष्टता नाही. यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागवूनच अवघड क्षेत्रा घोषीत करावे अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लांडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, सरचिटणीस सुनील शिंदे, कार्याध्यक्ष शरद वांढेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी संघाच्या शिष्टमंडळाने उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण यांचेशी समक्ष चर्चा केली. अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदली प्रक्रियेत न्याय मिळण्यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागवू असे आश्वासन रमजान पठाण यांनी दिले. या मागणीचे स्वागत शिक्षक नेते सर्जेराव राऊत, राज्य उपाध्यक्ष सुनिल जाधव, राज्य संघटक राजेंद्र निमसे, रामप्रसाद आव्हाड, प्रदिप चक्रनारायण, विष्णू चौधरी, संजय शेळके, शिवाजी ढाकणे, तालुकाध्यक्ष जर्नादन काळे, पांडुरंग देवकर, बुथेवल हिवाळे, सुधिर बोर्‍हाडे, बाळासाहेब जाधव, सुरेश नवले, प्रदिप चक्र नारायण, लक्ष्मण चेमटे, संतोष ठाणगे, संदिप भालेराव, भारत शिरसाठ, विलास लवांडे, दत्तागय परहर, शहाजी जरे, ज्ञानदेव कराड ,संजय सोनवणे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या