Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : धक्कादायक : प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्रक्रियेसाठी मागितले पैसे

Video : धक्कादायक : प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्रक्रियेसाठी मागितले पैसे

अंबासन | Ambasan

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (Ambasan Primary Health Center) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिले आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी (Family Welfare Surgery एका महिला रूग्णाकडून पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेच्या पतीने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडे तशी रितसर लेखी तक्रार दिल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून कठोर पाऊल उचलत जिल्हा आरोग्य विभागाकडे चौकशीची मागणी करत संबधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Demand money at phc ambasan baglan)

- Advertisement -

चिंचवे (ता.मालेगाव) (Chinchave Tal Malegaon) येथील सतिश गुलाब जाधव हे सकाळी अंबासन येथे ग्रामपंचायत कार्यालयात (Ambasan Grampanchayat Office) दाखल झाले. ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारी अर्ज दाखल केला. ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल्याचे वाचन करताच ‘पायाखालची जमीन सरकली’. यामध्ये असे लिहिले होते की, मी माझी पत्नी योगिता हिस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटूब कल्याण शस्त्रक्रियेसाठी दाखल केले होते.

मात्र, शस्त्रक्रियेनंतर डाॅक्टरांनी आमच्याकडे पाच हजार रूपयांची मागणी केली. त्यानुसार आम्ही तडजोड करून दोन टप्प्यांत चार हजार रूपये दिले. आमची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने हातउसनवार करून जमा केले.

रेल्वेचा प्रवास महागणार, वाचा कोणाला किती जास्त मोजावे लागणार पैसे

प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत सेवा दिली जाते. या हेतूनेच आम्ही पत्नीला दाखल केले होते. तर डाॅक्टरांनी पैसे घेणे योग्य आहे का? आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी होऊन न्याय मिळावा हीच विनंती. असे तक्रारीत नमूद केले आहे.

अर्जाचे वाचन करताच ग्रामपंचायत सदस्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले व सदर प्रकाराबाबत विचारपूस केली असता सुरूवातीला उपस्थित कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तर मिळाली.

IND vs SA : ऐतिहासिक मालिकेत भारताला विजयाची संधी

ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा आरोग्य आधिकारी कपिल आहेर यांना भ्रमणध्वनीवर घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर तालुका वैद्यकीय आधिकरी हर्षलकुमार महाजन यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली.

शस्त्रक्रिया करणा-या वैद्यकीय आधिका-यांनी शस्त्रक्रियेचे पैसे घेतल्याचा आरोप करीत स्थानिक वैद्यकीय आधिका-यांनी हात वर केले. सरकारी दवाखान्यात गरिबांसाठी मोफत सेवा दिली जात असल्याची भावना आहे.

IND vs SA : ऐतिहासिक मालिकेत भारताला विजयाची संधी

मात्र आरोग्य केंद्रात दाखल झाल्यानंतर पैशांची मागणी केली जात असेल तर सरकारी दवाखान्यात जाण्याचा उपयोगच काय? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या