Tuesday, May 14, 2024
Homeनाशिकदिंडोरी : लखमापूर फाट्यावर दिशादर्शकांची मागणी

दिंडोरी : लखमापूर फाट्यावर दिशादर्शकांची मागणी

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा येथे दिशादर्शकांची मागणी बरीच दिवसांपासून रेंगळत पडली असल्यामुळे प्रवासी वर्गामध्ये नाराजीचा सुर निघत आहे.

- Advertisement -

लखमापूर फाटा हा दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. येथून नाशिक, पिंपळगाव, वणी, गुजरात, भनवड, इ.गावांना जाण्यासाठी हा फाटा महत्त्वाचा मानला जातो. वणी कडून येणारा रस्ता हा चांगल्या स्वरूपाचा झालेला असल्यामुळे वाहने भरधाव वेगाने येत असतात.

त्यामुळे लखमापूर कडून अथवा परमोरी कडून येणा-या वाहनाना पुढील वाहने कळत नाही. त्यामुळे येथे आता पर्यंत अनेक छोटे मोठे अपघात झालेले आहे.

लखमापूर परिसरात औद्योगिक कंपन्या बरीच आहेत. त्यामुळे कामगार वर्ग काम आटोपल्या नंतर राञी बेराञी प्रवास करीत असतात. परंतु फाट्यावरून गाडी पास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.

तरी संबंधित विभागाने या फाट्यावर दिशादर्शक बसवण्यात यावे, अशी मागणी प्रवासी वर्ग, वाहन धारकांकडून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या