Thursday, April 25, 2024
Homeजळगावलाचेची मागणी भोवली ; आरोग्यधिकारी एसीबीच्या जाळ्यात

लाचेची मागणी भोवली ; आरोग्यधिकारी एसीबीच्या जाळ्यात

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

पंधराव्या वित्त आयोगाअतर्ंगत तालुकास्तरावर आरोग्यवर्धीनी केंद्रासाठी (Health Center) खाजगी मालकी हक्काची जागा भाडेत्तवावर मान्यता मिळवून देण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच जागा मालकाकडे मागणार्‍या चाळीसगांव तालुक्यातील तत्कालिन तालुका वैद्यकीय अधिकारी देवराम लांडे यांच्या विरोधात धुळे (dhule लाचलुचपत विभागाने (acb) आज पहाटे अचानक धडक देऊन कारवाई केली आहे. जिल्ह्यात मोठया अधिकार्‍यावर झालेल्या या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

गेल्या ७ मे २०२२ रेाजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या जाहिरातीनुसार तालुकास्तरवरील आरेाग्यवर्धीनी केंद्र उभारणीसाठी जागा भाडेत्तवावर घेणे यासाठी जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर शहरातील वाणी मंगल कार्यालयासमोर राहणारे प्रविण सोमनाथ आवारे यांनी त्यांच्या मालकीची जागा या केंद्रासाठी भाडेत्तवावर देण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव मंजूर करावा म्हणून त्यांनी तात्कालिन तालुका वैद्यकीय अधिकारी देवराम लांडे यांच्या कडे जागा मंजूरीसाठी पाठपुरावा सुरू होता. या दरम्यान लांडे यांनी त्यांच्याकडे ५० हजार रूपये लाचेची मागणी केली होती.

त्यानंतर प्रविण आवारे यांनी धुळे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार मांडली होती. या तक्रारीला अनुसरून लाचलुचपत विभागाने तक्रारदार प्रविण आवारे यांच्यासोबत एक पंच पाठवून डिजीटल व्हॉईस रेकॉर्ड द्वारे लाचेच्या मागणीची पडताळणी रेकॉर्ड केली होती. त्यानंतर लाचेची मागणी लाचलुचपत विभागातर्फे करून हा ट्रॅप लावला जाणार होता. मात्र तक्रारदार प्रविण आवारे याप्रकरणी दुर्लक्ष केल्याने आज पंच समक्ष व्हाईस रेकॉर्डच्या आधारावरून देवराम लांडे यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी धुळे येथील लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक दिलीप पाटील यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास एसीबीचे आधिकारी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या