नेवासा तालुक्यातील बेकायदा वीटभट्ट्यावर कारवाईची मागणी

jalgaon-digital
2 Min Read

नेवासा (तालुका प्रतिनिधी)

नेवासा तालुक्यातील ४१ विटभट्टासह संपूर्ण नगर जिल्ह्यात मातीची रॉयल्टी न भरता बेकायदा व बोगस विट्टभट्या चालु असुन त्याची चौकशी होऊन त्यावर कार्यवाही करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचेकडे केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना दिलेल्या निवेदनात गायके यांनी म्हंटले आहे की, माहिती अधिकार अर्जानुसार जिल्ह्यातील सन २०१५ ते आज अखेर पर्यंत ज्या ज्या विटभट्यांना परवानगी आहे त्या परवानग्यांच्या आदेशाच्या प्रती संदर्भात माहिती मागविली असता जिल्हा गौण खजिन अधिकारी यांनी प्रत्येक तालुक्याचे तालुका तहसिलदार यांना ६(३) अर्ज हस्तांतरीत केलेला आहे. विभट्टी परवाना दरवर्षी नुतनीकरण करतांना शासनाकडे मातीची रॉयल्टी जमा केली जाते. विटभट्टी परवानगी ग्रामपंचायत ठराव व जिल्हा प्रदुषण कार्यालय, अहमदनगर यांची पुर्व परवानगी, नंतर महसुल विभाग मातीसाठी रॉयल्टी जमा करुन नंतर परवानगी दिली जाते.

मात्र माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती नुसार नेवासा तालुक्यातील काही तलाठ्यांनी माहिती अधिकारांतर्गत दिलेली विटभट्टी संदर्भात माहितीवरून नेवासा तालुक्यात प्रवरा संगम (१), माळेवाडी खालसा (१),टोका (१),नेवासा खुर्द (१३), हांडीनिमगांव (२), मुकींदपूर (८), मक्तापुर (१), खुपटी (२),गोणेगाव (२), चिंचबन (१), कांगोणी (१), रांजणगाव (२), खरवंडी (६) अशा ४१ विटभट्ट्या गेल्या अनेक वर्षापासुन ते आजअखेर पर्यंत बेकायदा, बोगस शासनाला मातीची रॉयल्टी न भरता कुठलीही परवानगी न घेता चालु आहे. यांनी शासनाची अनेक वर्षाची रॉयल्टी बुडविलेली आहे.

विट्टभट्टीच्या माती परवानगी संदर्भात वरील मिळालेल्या माहितीवरून महसुल मिळालाच नाही, म्हणुन महाराष्ट्र शासनाची मोठी नुकसान झालेली आहे, लवकरात लवकर चौकशी करुन कार्यवाही करावी व त्याचा अहवाल मिळावा अशी मागणी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *