Thursday, April 25, 2024
Homeधुळेजवाहर मेडिकल फाउंडेशनमध्ये आता प्रसूती, सिझर होणार मोफत

जवाहर मेडिकल फाउंडेशनमध्ये आता प्रसूती, सिझर होणार मोफत

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये आता प्रसुती तसेच सिझर मोफत होणार आहे.

- Advertisement -

धुळे शहर तसेच जिल्हयातील सर्व गर्भवती महिलांना याचा लाभ मिळू शकेल, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विजय पाटील यांनी दिली आहे.

या हॉस्पिटलमध्ये गेल्या 30 वर्षांपासून आरोग्यसेवा सुरु आहे. आजवर हजारो गर्भवती महिलांची सुरक्षित प्रसुती झाली आहे. दरम्यान या हॉस्पिटलमध्ये प्रसूत होणार्‍या महिलांना केंद्र सरकारच्या प्राधानमंत्री मातृत्व वंदन योजना व राज्य शासनाच्या जननी योजनेचा लाभही दिला जातो.

आता प्रसुती तसेच सिझर पूर्णपणे मोफत होणार आहे. याशिवाय सर्व अटी व शर्ती पूर्ण करणार्‍या गर्भवती महिलांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळू शकेल. जननी सुरक्षा योजनेंतर्गत धुळे महापालिका क्षेत्रातील गर्भवती लाभार्थी महिलेला सोनोग्राफीत सूट दिली जाते.

हॉस्पिटलने आता सुरु केलेल्या या मोफत सुविधांचा जास्तीत जास्त गर्भवती महिलांनी या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.भाईदास पाटील, उपाध्यक्ष आ.कुणाल पाटील, डॉ.ममता पाटील, सहसचिव संगीता पाटील, अधिष्ठाता डॉ.विजय पाटील, मेडिकल सुपरीटेंडंट डॉ.आर.व्ही.पाटील, डॉ.मधुकर पवार, स्त्री रोग विभागाच्या प्रमुख डॉ.अलका पाटील, डॉ.नितीन कुलकर्णी यांनी केले आहे. याशिवाय कुटुंबकल्याण शस्त्रक्रियाही येथे होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या