Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र...नाहीतर तुम्ही जाणते नव्हे विश्वासघातकी राजे

…नाहीतर तुम्ही जाणते नव्हे विश्वासघातकी राजे

सांगली –

शरद पवार तुम्ही जास्त खोटे बोलू नका, नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात, अशी गंभीर टीका

- Advertisement -

रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केली आहे. नव्या कृषी कायद्यांना पाठींबा देताना सदाभाऊंनी ही टीका केली आहे. ते सांगलीत बोलत होते.

ते म्हणाले, पवार साहेबांचे मनावर घेऊ नका. ते नेहमी उलटे बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका तो दुसर्‍या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसे लिहून ठेवले आहे, मार्केट कमिटीत मालाच्या विक्रीसंदर्भात हे विरोध करतात आणि मात्र हेच शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात.

दरम्यान, सदाभाऊंनी त्यांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा केली. आजपासून यात्रेला सुरुवात झाली असून 27 डिसेंबरला या यात्रेची सांगता होणार आहे. भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते क्रांतीसिह नाना पाटील यांच्या सांगलीच्या किल्ले मच्छिंद्रगड गावामधून ही यात्रा सुरू झाली असून, या यात्रेची सांगता इस्लामपूर येथे एका जाहीर सभेने होणार आहे.

या सभेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, खोत यांच्या या यात्रेवर टीका होऊ लागली आहे. या यात्रेची सुरुवात भाजप नेते आशिष शेलार यांच्या हस्ते आणि सांगता चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. भाजप नेतेच या यात्रेचे अप्रत्यक्षपणे सारथी झाल्याने त्यावर टीका होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या