Thursday, April 25, 2024
Homeनगरदिल्ली काँग्रेसभवनावर शेतकरी मराठा महासंघाचा मोर्चा

दिल्ली काँग्रेसभवनावर शेतकरी मराठा महासंघाचा मोर्चा

अकोले |प्रतिनिधी| Akole

मराठा समाज व ओबीसी समाज यांच्यात वाद लावण्याचे काम करणार्‍या विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा,

- Advertisement -

या मागणीसाठी दिल्लीतील काँग्रेसभवनावर शेतकरी मराठा महासंघाच्यावतीने संभाजीराव दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राज गवांदे व तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार सर्व समाज बांधव गुण्यागोविंदाने राहत आहेत. मराठा समाजाने वडिलकीच्या नात्याने या समाजाला कधीही दुजाभावाची वागणूक दिली नाही.

राज्यात दलित, आदिवासी, ओबीसी समाजामध्ये कधीही वादविवाद नाही. राज्यातील यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वसंतराव नाईक, अ.र.अंतुले, सुशीलकुमार शिंदे यासारखे मुख्यमंत्री झाले परंतु राज्यात कधीही दुफळी माजवली नाही. मात्र या मंत्रिमंडळात काही मंत्री विनाकारण समाजात वाद लावणारे वक्तव्य करीत आहेत.

महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलने होत आहेत. हे आरक्षण कोणत्याही मराठा नेत्यांनी अथवा समाजातील घटकांनी ओबीसीमध्ये द्या, अशी मागणी केलेली नाही. आम्ही कोणाच्याही अधिकारावर गदा आणीत नाही. कोणाच्याही हिश्श्यात वाटेकरी होत नाही.

कोणाचे कमी करून आम्हाला द्या असेही मराठा समाज मागत नाही. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, अशीही मागणी केलेली नाही. आम्ही आमच्या हक्काचं मागतो. मग ओबीसी नेत्यांच्या पोटात का पोटसुळ उठला? बेताल वक्तव्य करून दोन समाजात दुही माजवून देत आहेत.

विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी न केल्यास नोव्हेंबरला नवी दिल्लीतील काँग्रेस भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा मराठा महासंघाचे अकोले तालुका उपाध्यक्ष अशोक आवारी, भाऊसाहेब हाडवळे, सचिव शिवाजी पाटोळे, संयुक्त चिटणीस बाळासाहेब कोकाटे, खजिनदार सुशांत वाकचौरे, युवक प्रतिनिधी अक्षय आभाळे, विद्यार्थी प्रतिनिधी अमोल मोरे, महिला प्रतिनिधी वर्षा चौधरी, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कदम, अमोल येवले, अविनाश तळेकर, संदीप शेळके यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या