Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशदिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण : घटनास्थळावर चिठ्ठी सापडली, दोन जण CCTV मध्ये कैद

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण : घटनास्थळावर चिठ्ठी सापडली, दोन जण CCTV मध्ये कैद

दिल्ली l Delhi

दिल्लीतील एपीजे अब्दुल कलाम रोडवर इस्त्रायली दूतावासाजवळ आयडी स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान घटनास्थळी

- Advertisement -

पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली होती. या चिठ्ठीतून या हल्ल्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा संकेत मिळत आहे. पोलिसांनी परिसरातील तीन सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली. त्याचबरोबर सापडलेल्या चिठ्ठीत हा तर फक्त ट्रेलर आहे, असा इशारा देण्यात आल्याचं समोर आलं आहे. इस्रायली दूतावासाजवळ कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट झाल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

दरम्यान, बॉम्बस्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आलीय. याअगोदर, स्फोटासाठी आयईडीचा वापर करण्यात आल्यीच शक्यता प्राथमिक चौकशीनंतर व्यक्त करण्यात आली होती. स्फोटासाठी छोट्या छोट्या बॉल बेअरिंगचाही वापर करण्यात आला. तपास यंत्रणेला घटनास्थळी सॉफ्ट ड्रिंकच्या कॅनचे काही छोटे छोटे तुकडेही मिळालेत. तपास यंत्रणेला स्फोटाच्या फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतिक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या