Friday, April 26, 2024
Homeधुळेशिष्टमंडळाने घेतली कदमबांडेंची भेट

शिष्टमंडळाने घेतली कदमबांडेंची भेट

दोंडाईचा – Dondaicha – वि.प्र :

दोंडाईचा येथील मयत मोहन मराठे यांच्या कुटुंबीयांनी नुकतीच माजी आ. राजवर्धन कदमबांडे यांची भेट घेऊन मयताच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

- Advertisement -

यासंदर्भात माजी आ. राजवर्धन कदमबांडे यांनी वैयक्तिक लक्ष घालत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊ, असे उपस्थितांना आश्वासित केले.

दोंडाईचा मराठा समाज शिष्टमंडळाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक विजय मराठे, दिलीप शेळके अशोक मराठे, वेडु चव्हाण, ज्ञानेश्वर मराठे, बबलू मराठे यावेळी उपस्थिती होती.

दोंडाईचा शहर मराठा समाज व पदाधिकारी यांनी उपोषणासाठी परवानगी मिळो अथवा न मिळो आमरण उपोषण होणार, असे सांगितले.

मयत मोहन मराठे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी शहरातील विविध समाजाकडून पाठिंब्याचे पत्र मिळाले असल्याची माहिती मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने दिली.

यात क्षत्रिय मराठा समाज दोंडाईचा शहर, धनगर समाज पंच मंडळ, दोंडाईचा शहर व्यापारी असोसिएशन, दोंडाईचा शहर हमाल मापाडी गुमास्ता कामगार संघटना, दोंडाईचा शहर ठाकूर समाज, एकलव्य आदिवासी भील जनसेवा मंडळ, दोंडाईचा शहर शिंपी समाज यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या