भविष्यातील संघर्षांसाठी आत्तापासून तयार राहा; काय म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली | New Delhi

सामाजिक आणि आर्थिक प्रगती सुनिश्चित करण्यासाठी सागरी सीमा सुरक्षित (Secure Maritime Borders) असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी व्यक्त केले आहे.

धक्कादायक : शेजारी राहणार्‍या मित्राने झाडल्या 16 वर्षीय मुलीवर गोळ्या!

वाढत्या धोक्यांना प्रभावीपणे प्रतिकार करण्यासाठी, सशस्त्र दलांनी भविष्यातील क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच किनारपट्टीवर चीन (China) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) सीमेवर उच्च ऑपरेशनल तत्परता राखली पाहिजे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी सोमवारी वरिष्ठ नौदलाच्या (Navy) अधिकार्‍यांशी बोलताना सांगितले. राजनाथ सिंग म्हणाले, भविष्यातील संघर्ष अप्रत्याशित असतील. त्यासाठी तयार राहा. सतत विकसित होत असलेल्या जागतिक व्यवस्थेने प्रत्येकाला पुन्हा धोरण आखण्यास भाग पाडले आहे.

मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेवरील नौदल कमांडर्सच्या परिषदेला हजेरी लावली. वास्तविक सोमवारपासून नौदलाच्या कमांडर कॉन्फरन्सला सुरुवात झाली आहे. आयएनएस (INS) विक्रांतवर समुद्राच्या मध्यभागी कमांडरची ही बैठक पहिल्यांदाच होत आहे. पाच दिवस चाललेल्या या परिषदेच्या पहिल्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी नौदलाच्या सर्वोच्च कमांडर्सना संबोधित केले.

शेतकऱ्यांची खरीपाच्या संकटानंतर अवकाळीमुळे रब्बीची पिकेही संकटात

भारतीय नौदलाच्या भविष्यकालीन समस्यांना तोंड देण्यासाठी असणार्‍या क्षमतेचा आढावा घेण्यात आला आहे. कमांडरना संबोधित करताना सिंह यांनी सामाजिक आणि आर्थिक प्रगती सुनिश्चित करण्यासाठी सागरी सीमा सुरक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नव्या जोमाने काम करत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *