पत्रकारांविषयी अर्वाच्च भाषेत बोलणार्‍या भास्करराव पेरे यांच्यावर गुन्हा दाखल

jalgaon-digital
1 Min Read

जामखेड (तालुका प्रतिनिधी) –

जामखेड येथे एका कार्यक्रमात आदर्श गाव पाटोदा (जि. औरंगाबाद) चे माजी संरपच व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांनी पत्रकारांना अपमानीत

करून अर्वाच्य भाषा वापरून व मी एक फकीर आहे, माझे कोणीच काही करू शकत नाही, अशा शिव्या देऊन एक धमकी दिल्यासारखे भाषणात बोलले. याप्रकरणी भास्कर पेरे यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला

ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीच्या झालेल्या पराभवाच्या रागातून काय प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया या पत्रकारांविषयी अर्वाच्य भाषा वापरून अपमानित केले होते. जामखेडमधील सर्व पत्रकारांनी निषेध करत तहसीलदार विशाल नाईकवाडे व पो. नि. संभाजी गायकवाड यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

जामखेड येथे 4 फेब्रुवारी रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे जामखेड येथे पोलीस वसाहतीच्या भूमिपूजन प्रसंगी आले असताना त्यांना जामखेड पत्रकारयांनी निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. गृहराज्यमंत्री देसाई यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. दि. 7 रोजी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *