Thursday, April 25, 2024
Homeजळगावदिपनगर वीज निर्मिती केंद्रातील बंद गाळे ठरताय मद्यपींचा अड्डा

दिपनगर वीज निर्मिती केंद्रातील बंद गाळे ठरताय मद्यपींचा अड्डा

फेकरी, ता.भुसावळ – Fekari – Bhusawal – वार्ताहर :

वीजनिर्मिती केंद्राच्या कामगार वसाहतीत कोरोना चा पार्श्वभूमीवर गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून दीपनरातील बंद गाळ्यांमध्ये अल्पवयीन मुलांसह तरूण नशेच्या आहारी जात असल्याचे प्रमाण वाढु लागले आहे. यांना बारमध्ये बसण्याची व्यवस्था नसल्याने दीपनगर वीज निर्मिती केंद्राचे बंद गाळ्यांमध्ये मद्य प्रेमींसाठी एक प्रकारे नशा करण्याचे केंद्रच बनवले आहे. मोठ्या प्रमाणात रात्री 9 वाजेच्या सुमारास मद्य सेवन करण्यासाठी हे नशे बहाद्दर जमतात. मद्य सेवन करून झाल्यावर रिकाम्या झालेल्या बियरचा बाटल्या घटनास्थळी सोडुन पळ काढतात.

- Advertisement -

इतकेच नव्हे तर काही बंद गाळ्यांचे कडीकोंडे तोडुन या मद्य प्रेमींनी रोज बसण्यासाठी रुमांची साफसफाई देखील करुन ठेवली आहे. मद्य प्रेमी या परिसरात वावरत आसतांना याबाबत सुरक्षा रक्षकांचे दुर्लक्ष का होते? असा प्रश्न दीपनगर वासीयांना पडला आहे. स्वतः तैनात केलेल्या सुरक्षा रक्षाकांना हा प्रकार डोळ्याने दिसत असून तेरी भी चुप मेरी चुप कोणाला काही सांगू नका, आशी गत या रक्षाकांमध्ये सुरू आहे. यामुळे दिपनगर कामगार वसाहतीमध्ये तैनात केलेल्या सुरक्षा रक्षक नशेखोरांना रोखण्यात सपशेल अपयशी ठरत आहे.

व्यसनासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जातो. सवय लागली की हेच अल्पवयीन मुले दिपनगर वीज केंद्रात चोर्‍या करण्यास सज्ज होतात. या नशेखोरांवर सुरक्षा विभागाकडून कारवाई होण्याची गरज असून तरीही दीपनगर प्रशासन डोळे मिटून मुक झाकले आहे, अशी चर्चा ही परिसरात होत आहे, सुरक्षा विभागाने ठोस पावले उचलावी बंद गाळ्यात मद्य सेवन करण्यार्‍यांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी दीपनगर परिसरातुन मागणी होत आहे. यावेळी सुरक्षा विभाग कितपत जागे होऊन कोणती कारवाई करेल? हे पाहणे रहस्यमय ठरले.

- Advertisment -

ताज्या बातम्या