Tuesday, April 23, 2024
Homeजळगावराज्यात 6 हजार मे.वॅ. वीजेच्या मागणीत वाढ

राज्यात 6 हजार मे.वॅ. वीजेच्या मागणीत वाढ

भुसावळ – Bhusaval – आशिष पाटील :

करोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे औद्योगिक क्षेत्रासह सर्वच अस्थापने लॉकडाऊन झाल्यामुळे राज्यातील विजेची मागणी 12 हजार मेगावॅटवर गेली होती. ती आता

- Advertisement -

अनलॉक नंतर तब्बल सहा हजार मे.वॅ.ने वाढून 18 हजरांवर पोहचली आहे. वाढत्या विजेच्या मागणीमुळे दीपनगर प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु असून 942 मे.वॅ. विजेची निर्मिती करण्यात आली.

राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर सर्वच अस्थापने शत प्रतिशत बंद अल्यामुळे विजेच्या मागणीत घट झाली होती.त्यांतर एमओडी (मिरिट आर्डर डिस्पॅच) चे कारण दाखवत महाजेनकोने दीपनगर प्रकल्पाती कार्यान्वित दोनही (संच 4 व 5) बंद करण्यात आले होते.

तब्बल दिड महिण्यांहुन अधिक काळ हे संच बंद होते. दीपनगर सह नाशिक, परळीसह अन्या विज निर्मिती केंद्र शट डाऊन करण्यात आले होते. त्या काळात राज्यातील विजेची मागणी 22 हजार मे.वॅ. वरुन 12 -14 हजारांवर येवून ठेपली होती.

राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंरत सर्वत्र औद्योगिक तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालये आता जवळ-जवळ पूर्ण क्षमतेने सुरु होत असल्यामुळे राज्यातील विजेच्या मागणीत आपसूक वाढ झाली . ती आता 18 ते 19 हजारांवर पोहचली आहे.

दि. 2 नोव्हेंबर रोजी राज्यातील विजेच्या मागणीत वाढ होऊन 18095 मे. वॅ. इतकी नोंद करण्यात आली होती.

मात्र महाजेनकोच्या सातही विज निर्मिती प्रकल्पातून फक्त 12 हजार 949 मे.वॅ. विजेची निर्मिती झाली. ही तुट भरुन काढण्यासाठी राज्याने एनटीपीसीकडून 5704 मे.वॅ. विजेची तुट भरुन काढण्यात आली.

दोन संचातून 942 मे.वॅ. निर्मिती- दरम्या, दीपनरगर प्रकल्पातील तीन पैकी दोन (संच 4 व 5) मधून 2 रोजी 942 मे. वॅ.विजेची निर्मिती करण्यात आली. संच क्र. 3 हा एमओडीच्या कारणामुळे बंदच ठेवण्यात आला आहे. या संचाचा एमओडी मागील महिन्यात 3.14 रुपये इतका असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. ती रक्कम अधिक असल्यामुळे सध्या संच क्र 3 बंदच आहे.

प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु – राज्यातील विजेची घटलेल्या मागणीमुळे अनेक प्रकल्प बंद करण्यात आले होते . मात्र अनलॉकमुळे वाढती विजेची मागणी पाहाता. आता दीपनगर सह नाशिक व परळीचे विज निर्मिती प्रकल्प ही कार्यान्वित करण्यात आले आहे.

राज्यातील विज निर्मिती अशी- दीपनगर -942 मे.वॅ. नाशिक 124, कोराडी 862, खापरखेडा 1037, पारस 444, परळी 313, चंद्रपुर 1995 तर उरण गॅस मधून 236 अशी महाजेनकोमधून 6हजार 411 मे.वॅ. तर अन्य विज प्रकल्पातून मिळून राज्यात 12 हजार 949 मे.वॅ. विजेची निर्मिती झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या