Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रदीपाली चव्हाण आत्महत्या : तक्रारीची दखल न घेणारे मुख्य वनसंरक्षक निलंबित

दीपाली चव्हाण आत्महत्या : तक्रारीची दखल न घेणारे मुख्य वनसंरक्षक निलंबित

मुंबई –

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून अमरावती जिल्ह्यात वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या

- Advertisement -

केली. या प्रकरणी दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीची दखल न घेणारे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस.रेड्डी यांना निलंबित करण्यात आले आहे. रेड्डी हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी भेट घेतली, या भेटीनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाणने चार पानांची सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. या चिट्ठीत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक एम.एस.रेड्डी यांचा उल्लेख करत मानसिक त्रास दिल्याचे दिपाली चव्हाणने म्हटले होते. यामुळे रेड्डी वादाच्या कचाट्यात सापडले आहेत. अखेर एम.एस रेड्डी यांचे अखेर निलंबन केले आहे.

आर.एफ.ओ. दीपाली चव्हाणने वारंवार शिवकुमार त्रास देत असल्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकारी एम.एस.रेड्डी यांच्याकडे केली होती परंतु एम.एस रेड्डी यांनी नेहमी घटनेची दखल घेतली नाही. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार पानांची चिठ्ठी लिहीली आहे. यामध्ये विनोद शिवकुमार आणि व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक रेड्डी यांचे नाव नमूद करण्यात आलेले आहे. दीपाली चव्हाणने असेही म्हटले आहे की, काही लोकांनी वरिष्ठांचे कान भरले असल्यामुळे मला त्रास दिला जात आहे. तसेच आपल्या आत्महत्येला शिवकुमार जबाबदार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. शिवकुमारला धारणी न्यायालयाने अटक करत सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. शिवकुमारला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याच्या शासकीय निवासस्थानी जाऊन तपास केला होता.

दीपालीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये डिएफओ विनोद शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वरिष्ठ अधिकारी डीओपी विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकरी आणि कर्मचार्‍यांसमोर अश्लील शिवीगाळ करतात, रात्री बेरात्री भेटायला बोलवतात. त्यांच्या मनाप्रमाणे न वागल्यास वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देतात. असे दिपालीने सुसाइट नोटमध्ये लिहिले आहे. तसेच यापूर्वी डिएफओ विनोद शिवकुमार यांची मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रेड्डी यांच्याकडे तक्रार केली मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याला उल्लेख दिपाली यांनी सुसाईट नोटमध्ये केलेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या