Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी सर्वांनी एकत्र या- पटारे

श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी सर्वांनी एकत्र या- पटारे

भोकर |वार्ताहर| Bhokar

आपल्या विकासाच्यादृष्टीने जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर मुख्यालय होण्यासाठी एकत्रीत लढा उभारण्यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर पाणी प्रश्नासाठी लढा उभारावा लागणार आहे. अशा विविध प्रश्नांवर राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी केले.

- Advertisement -

भोकर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्व. दत्तात्रय मारूती गिरमे सेवा प्रतिष्ठानच्यावतीने स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आयोजीत ‘सन्मान भुमिपुत्रांचा, गौरवरत्नांचा’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खंडेराव पटारे होते. याप्रसंगी डॉ. दिलीप शिरसाठ, चक्रधर महानुभव आश्रमाचे महंत गुंफेकरबाबा, माळवाडगावचे सरपंच बाबासाहेब चिडे, गिरीधर आसने, अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब विधाटे, अण्णासाहेब चौधरी, भागवतराव पटारे, सूर्यभान शेळके, भाऊसाहेब चव्हाण, दिगंबर झिने, पुंडलीक पटारे, महेश पटारे, मच्छिंद्र पटारे, तुकाराम शिंदे, निवृत्ती पटारे, बाबासाहेब साळवे आदी उपस्थित होते.

नेहमी सकारात्मक विचार करा, यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशा पुरस्कारांतून प्रोत्साहान मिळत असते असे सरपंच बाबासाहेब चिडे यांनी सांगितले. तर कर्म करत जा पण फळाची अपेक्षा करू नका या वृत्तीप्रमाणे थोर स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय गिरमे यांनी आपले जीवन व्यतीत केले असे महंत गुंफेकरबाबा यांनी सांगितले. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य भिमाशंकर शेळके, मच्छिंद्र पटारे यांनी मनोगतं व्यक्त केली, स्वातंत्र्य सैनिक कै. दत्तात्रय मारूती गिरमे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व खरेदी विक्री संघाचे संचालक संचित गिरमे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दिपाली चव्हाण यांनी केले तर आभार महेश पटारे यांनी मानले. समाजातील विविध स्तरातील व्यावसायिक, प्रगतिशील शेतकरी, सरपंच, उत्कृष्ठ कार्य करणारे नोकर, सैनिक, मेडिकल अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी एकनाथ लोखंडे, भाऊराव सुडके, अण्णासाहेब शेळके, गणेश खेडकर, ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे, राहुल अभंग, बाळासाहेब पटारे, राजेंद्र तागड, सतीश शेळके, राजेंद्र चौधरी, सुनील विधाटे, अरुण काळे, सोपान कोल्हे, दीपक शेळके, मच्छिंद्र काळे, ज्ञानेश्वर काळे, गोरख डूकरे, सुरेश अमोलीक, रावसाहेब लोखंडे, राजेंद्र विधाटे, ठकसेन खंडागळे, नरहरी नाईक, सलीम पठाण, मोहन गाढे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या