Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशलाल किल्ला हिंसाचार प्रकरणी अभिनेता दीप सिद्धूला अटक

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी अभिनेता दीप सिद्धूला अटक

दिल्ली l Delhi

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर हिंसाचार भडकवण्याचा आरोप असलेला अभिनेता आणि आंदोलक दीप सिंधू (Actor Deep Sidhu) याला अटक झाली आहे.

- Advertisement -

२६ जानेवारीला शेतकरी शांतपणे आणि नेमून दिलेल्या मार्गावरून ट्रॅक्टर रॅली काढणं अपेक्षित होते. मात्र अचानक काही जण बॅरिकेटिंग तोडत थेट लाल किल्ल्यावर पोहचले आणि तेथे त्यांनी तिरंग्याच्या बाजूला दोन- तीन आपले स्वतःचे झेंडे फडकवले आणि काही तास दिल्लीत अराजकतेचे वातावरण बघायला मिळालं होतं. दरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा फडवणं, रस्त्यात सार्वजनिक वस्तूंची नासधूस करत पुढे जाणार्‍यांमध्ये दीप सिंधूचा देखील समावेश होता. मात्र तो २६ जानेवारीपासून फरार होता. तो पोलिसांना सापडत नसला तरीही तो फेसबूकवर काही पोस्ट टाकत होता. सोशल मीडीयावर अ‍ॅक्टिव्ह असून देखील पोलिस त्याला शोधू कसे शकत नाहीत? हा प्रश्न अनेकांच्या मनात होता पण अखेर आज त्याला बेड्या ठोकण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीमध्ये हिंसाचार झाला होता. नवीन कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर निशाण साहिब धार्मिक ध्वज फडकावला होता. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर अभिनेता दीप सिद्धू याचं नाव समोर आलं होतं. दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला होता. त्याचबरोबर दीप सिद्धूला अटक करण्याची मागणीही सातत्यानं केली जात होती.

तसेच, दिल्लीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावर वेगळाच ध्वज फडकविल्याप्रकरणी अभिनेता दीप सिद्धू, जुगराज सिंगसह इतर दोन आरोपींचा दिल्ली पोलीस शोध घेत होते. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली असून, सर्व आरोपींवर प्रत्येकी एक-एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. त्याशिवाय इतर काही आरोपींवर प्रत्येकी ५०-५० हजार रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च दरम्यान हिंसा भडकली होती. त्याचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या