Friday, April 26, 2024
Homeनाशिकवाचनालय व मंदिर सभामंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न

वाचनालय व मंदिर सभामंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतुन प्रभाग क्रमांक 28 वनश्री कॉलनी येथे वाचनालय इमारत व श्रीकृष्ण नगर डिजीपी नगर येथे बांधण्यात आलेल्या श्री तुळजा भवानी मंदिर सभामंडपाचा लोकार्पण सोहळा झाला.

- Advertisement -

आमदार सीमा हिरे, नगरसेवक दिपक दातीर, नगरसेविका प्रतिभा पवार, महेश हिरे, भाजपा शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजपा शहर सरचिटणीस जगन पाटील, मंडल अध्यक्ष अविनाश पाटील डॉ. वैभव महाले, डॉ. विनय मोगल, धनाजी लगड यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी आमदार हिरे यांनी मनोगतात सांगितले की,प्रभाग क्रमांक 28 मध्ये आमदार निधीतुन जवळपास 2 कोटीची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये महिलांसाठी ग्रीन जीम, जॉगिंग ट्रॅक, तरुणांसाठी जिम्नॅशियम हॉल, सभामंडप, तसेच परिसरातील धोकादायक विद्युततारा भुमिगत करण्यात आलेल्या आहेत. मतदार संघातील नागरिकांनी जे जे प्रश्न समस्या मांडल्या त्या सोडविण्याचा तसेच शासनदरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

यावेळी धनाजी लगड यांनी वाचनालयासाठी ग्रंथ व कपाटे उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती दिली. यावेळी अशोक पवार, आदित्य दोंदे ,किरण गाडे, अनिकेत कदम, महेंद्र थोरात, बाळासाहेब पवार, प्रकाश देशमानकर, महिला आघाडीच्या अर्चना दिंडोरकर, रश्मि हिरे- बेंडाळे , समाधान दातीर, रघुनाथ शिंदे, नितीन पुंड, काशिनाथ चौधरी, सदाशिव पोटे, दादाजी मोरे, धोंडगे, यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या