Thursday, April 25, 2024
Homeनगर17 व्यक्तींनी केली समर्पित आयोगाच्या भेटीसाठी नाव नोंदणी

17 व्यक्तींनी केली समर्पित आयोगाच्या भेटीसाठी नाव नोंदणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समर्पित आयोगाचे सदस्य आज (रविवारी) नाशिकला येणार आहेत. यावेळी नगर जिल्ह्यातील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था आणि व्यक्तींना सायंकाळी त्यांनी भेटीसाठी दोन तासांचा वेळ दिलेला आहे. या भेटीसाठी नाव नोंदणी सक्तीची करण्यात आली असून त्यानूसार शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात 17 व्यक्तींनी ओबीसी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका आणि आयोगाच्या सदस्यांच्या भेटीसाठी नाव नोंदणी केली आहे.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनाच्या बेफिकीरपणानंतर दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यायाल समर्पित आयोगाला निवेदन पाठविण्यासाठी आणि आयोगाच्या सदस्यांना भेटीसाठी कक्ष सुरू करण्यात आला. त्याठिकाणी काही व्यक्तींना बसवून त्यांच्या मार्फत आयोगाला सादर करण्यात येणारे निवेदन स्वीकारण्यात आले. यावेळी भाजप ओबीसी सेलच्यावतीने किशोर डागवाले आणि ज्ञानेश्वर काळे, अखिल भारतीय समता परिषदेच्यावतीने दत्ता जाधव, शिवसेनेच्यावतीने सुवर्णा जाधव, संभाजी कदत आणि सचिन जाधव, अखिल भारतीय समता परिषदेच्यावतीने किशोर राऊत, हेमंत गिरमे, शुभम धाडगे आणि मच्छिंद्र धाडगे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने प्रशांत शिंदे, धनंजय दुधाळ, शहर जिल्हा ओबीसी आणि व्हिजेएनटी सेलच्यावतीने बाळासाहेब भुजबळ, फुले बिग्रेडच्यावतीने दीपक खेडकर आणि काँग्रेस कमिटी ओबीसी सेलच्यावतीने मंगला भुजबळ आणि अन्य एकाचा अशा 17 व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाकडे ओबीसी आरक्षणासाठी या सर्वांनी आपली भूमिका राजकीय पक्ष, सामाजिक संघटना अथवा व्यक्तीगत पातळीवर मांडली आहे. यासह समक्ष नाशिकला जावून समर्पित आयोगाच्या सदस्यांची भेट घेवून आपली भूमिका ते मांडणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यानीने सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या